esakal | अमिताभ फायटर आहेत...ते कोरोनावर मात करणारच; वाचा कोण म्हणालंय तर...
sakal

बोलून बातमी शोधा

big bs makeup man

कुठल्याही संकटाचा सामना कसा करावा, सकारात्मक विचार कसा कायम ठेवावा, अशा गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहे. ते सतत काम आणि काम करीत असतात. त्यांचा आदर्श आजच्या तरुणांनीच नाही तर वयोवृद्धांनी घेण्यासारखा आहे.

अमिताभ फायटर आहेत...ते कोरोनावर मात करणारच; वाचा कोण म्हणालंय तर...

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : अमिताभ बच्चन हे यंग ओल्ड मॅन आहेत. मी गेली सत्तेचाळीस वर्षे त्यांच्याबरोबर काम करीत आहे. आपल्या जीवनात अनेक चढउतार त्यांनी पाहिलेले आहेत. कुली चित्रपटाच्या वेळी त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्या गंभीर आजारातूनही ते बाहेर आले आणि पुन्हा काम करू लागले. त्यानंतर अधे-मधे आजारी पडले आहेत आणि ठणठणीत बरे झाले आहेत. ते फायटर आहेत. अजिबात घाबरणारे नाहीत. त्यामुळे आताही ते कोरोनावर नक्कीच मात करतील, असे अमिताभ बच्चन यांचे मेकअपमन दीपक सावंत यांनी सांगितले.

मराठी चित्रपटसृष्टी येतेय हळूहळू पूर्वपदावर; टिझर लॉंचिंगसह चित्रीकरणाला सुरुवात...​

कुठल्याही संकटाचा सामना कसा करावा, सकारात्मक विचार कसा कायम ठेवावा, अशा गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहे. ते सतत काम आणि काम करीत असतात. त्यांचा आदर्श आजच्या तरुणांनीच नाही तर वयोवृद्धांनी घेण्यासारखा आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतरांना प्रेरणा देणारे आहे. काम ही त्याची पूजा आहे आणि कामावर त्यांनी नेहमीच प्रेम केले आहे. 

मुंबईने करून दाखवलं; दररोज केवळ 'इतक्याच' बेडची आवश्यकता...

कुली चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्यांना गंभीर दुखापत झाली होती. बंगळूर येथे चित्रीकरण होते. लगेच त्यांना तेथून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलविण्यात आले आणि ते गंभीर आजारातूनही ठणठणीत बरे झाले. कारण ते फायटर आहेत आणि कोणत्याही गोष्टींना ते मोठ्या हिमतीने सामोरे जातात. सध्या लॉकडाऊनच्या काळात ते घरीच आहेत. त्यांना कोरोनाची बाधा कशी झाली हा मोठा प्रश्न आहे. कोरोनावर ते नक्कीच मात करतील. त्यांना काहीही झालेले नाही, असेही दीपक सावंत म्हणाले. 
---
संपादन : ऋषिराज तायडे
 

loading image