मनोरंजनातून प्रबोधन करणारे 'पुण्यातले अमिताभ बच्चन'

ज्युनिअर अमिताभ बच्चन यांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे....
junior bachchan news
junior bachchan news Team esakal

मुंबई - कोरोनाचा वाढता कहर मनोरंजन क्षेत्रासाठी (entertainment) देखील धोकादायक ठरताना दिसला. त्याच्या प्रभावामुळे अनेक सेलिब्रेटींना फटका बसला होता. रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (actress shilpa shetty) तर अख्खे कुटूंब कोरोनामुळे क्वॉरनटाईन झाले होते. अशासगळया परिस्थितीमध्ये काही नकलाकारांनी सोशल मीडियावर कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. त्यांना उभारी देत कोरोनातून बाहेर येण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यासगळ्या परिस्थितीत पुण्याचे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) अशी ओळख असणा-या शशिकांत पेडवळ (shashikant pedwal) यांनी कोरोना पेशंटशी बच्चन स्टाईलनं संवाद साधत त्यांचे मनोरंजन केले आहे. (Big B lookalike from Pune interacts with COVID patients viral on social media)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (junior amitabh bachchan) ज्युनिअर अमिताभ बच्चन अशी ओळख असणा-या शशिकांत पेडवळ यांची चर्चा आहे. त्यांनी शेअर केलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होताना दिसत आहेत. मोठ्या खुमासदार आणि रंगतदारपणे त्यांनी पेशंटशी बच्चन स्टाईलमध्ये साधलेला संवाद सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. काही रुग्णालयांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून पडवळ यांनी सादरीकरण केले आहे. त्यात त्यांनी रुग्णांना कोरोनाच्या काळात घ्यायची काळजी, याविषयी माहिती दिली आहे.

51 वर्षांचे पेडवळ हे व्यवसायानं शिक्षक आहेत. त्यांची ओळख आता पुण्याचे अमिताभ बच्चन अशी आहे. ते सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांना कोरोना आजार, कोरोना होऊ नये म्हणून घ्यावी लागणारी खबरदारी याविषयी मार्गदर्शन करताना दिसतात. ते आपल्या सादरीकरणातून रुग्णांना सांगतात, कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. त्यामुळे आपल्याला आवश्यक ती काळजी घ्य़ावीच लागेल. मी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम यानिमित्तानं करतो आहे. त्यासाठी मी पैसे घेतलेले नाहीत. असं पडवळ सांगतात.

junior bachchan news
'वडिलांनी दुसरं लग्न केल्यावर आईचा आत्महत्येचा प्रयत्न'
junior bachchan news
बॉक्स ऑफिसवर येणार फरहानचं 'तूफान', रिलिज डेट व्हायरल

सोशल मीडियावर ज्युनिअर बच्चनजींचा मोठा फॉलोअर्सही आहे. युवकांमध्येही त्यांची क्रेझ आहे. कोरोनाच्या काळात पेडवळ यांनी मिमिक्रीच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे. जे लोकांच्या पसंतीचा विषय़ ठरले आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांनाही घटकाभर का होईना त्यांच्या कार्यक्रमानं दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांना आनंदही झाला आहे. आपल्याबरोबर साक्षात बच्चन बोलत आहेत असे म्हटल्यावर काही वेळ का होईना लोकांना आनंद होतो. ही भावना आपल्याला सुखावून जाणारी आहे. असेही पेडवळ सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com