'हाडं गोठवणारी थंडी, शुटिंगवरुन बिग बी परतले माघारी' 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

बॉलीवूडमधलं मानाचं पान असणा-या अमिताभ बच्चन यांच्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी सर्वांना आपलेसं केले आहे. जगात फार कमी कलाकार आहेत की ज्यांच्या वाट्याला न भुतो न भविष्यती अशी लोकप्रियता वाट्याला येते त्यात अमिताभ यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

मुंबई - बॉलीवूडमधलं मानाचं पान असणा-या अमिताभ बच्चन यांच्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी सर्वांना आपलेसं केले आहे. जगात फार कमी कलाकार आहेत की ज्यांच्या वाट्याला न भुतो न भविष्यती अशी लोकप्रियता वाट्याला येते त्यात अमिताभ यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. भारतीय हिंदी सिनेसृष्टीत आपल्या नावाने वेगळा अध्याय लिहिणा-या अमिताभ यांचा उत्साह, त्यांची कार्यशैली हे सारे अचंबित करणारे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोशल मीडियावरही बिग बी चांगलेच ॲक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. ते त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. ज्युनियर कलाकारांना प्रोत्साहन देणे, त्यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देणे हे सारे अगत्यानं करत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांचा फॅनफॉलोअर्सही वाढताना दिसत आहे. बिग बी नुकतेच चित्रिकरणासाठी लडाखला गेले होते. मात्र तेथील जीवघेण्या थंडीनं त्यांना नकोसे केले. आणि ते चित्रिकरणावरुन माघारी आले आहेत.

दीपिका पदूकोणच्या बर्थ डे पार्टीत आलिया-रणबीरचा ग्लॅमरस अंदाज

आपल्या या अनुभवाविषयी बिग बी यांनी व्टिटरवर लिहिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, लडाखला गेलो होतो, पण लगेच परत आलो. उणे ३३ अंश सेल्सिअसचं तापमान. मी अंगात थर्मल सूट घातला होता. मात्र, हा सूटदेखील मला थंडीपासून वाचवू शकला नाही, अशी कॅप्शन बिग बींनी आपल्या फोटोला दिली आहे. दिलं आहे.  सध्या लडाखमध्ये जीवघेणी थंडी असून तेथे उणे ४० डिग्री तापमान आहे. सत्तरी ओलांडलेले बिग बी आजदेखील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून ओळखले जातात. सध्या ते त्यांच्या एका आगामी चित्रपटाचं चित्रीकरणात व्यस्त आहेत. चित्रीकरणासाठी ते लडाखला गेले होते. मात्र, तेथील हाडं गोठावणाऱ्या थंडीमुळे त्यांना परतावं लागलं आहे. या सेटवरील एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

बर्थ डे स्पेशल: 'या' चमत्कारामुळे ए आर रहमानने स्विकारला इस्लाम धर्म, नावाचाही आहे खास किस्सा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big b return ladakh extreme cold minus 34 degree tempreture post viral