Big Boss Marathi 4: 'सरकार पडणार, मला आधीच कुणकुण होती..; मांजरेकर स्पष्टच बोलले Mahesh Manjrekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss Marathi 4 Host Mahesh Manjrekar speaks on Maharashtra Politics, Mahavikas Aaghadi

Big Boss Marathi 4: 'सरकार पडणार, मला आधीच कुणकुण होती..; मांजरेकर स्पष्टच बोलले

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठी सिझन ४ ला लवकरच सुरुवात होतेय. यंदा कोणकोणते स्पर्धक घरात दिसणार यावरनं चर्चा रंगली असताना आता महेश मांजरेकरांनी बिग बॉस मराठी निमित्तानं दिलेल्या मुलाखतीतील काही वक्तव्यांची अधिक चर्चा रंगलेली दिसून येत आहे. बिग बॉस मराठी ४ निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बोलताना मांजरकरांची गाडी हळूहळू राजकारणावर आली आणि महाराष्ट्रातील राजकारण अन् नेतेमंडळी यांच्यावर त्यांनी आपली काही स्पष्ट मतं मांडली.

याचवेळी मांजरेकरांनी बिग बॉसच्या घरात कोणत्या राजकीय नेत्यांना स्पर्धक म्हणून पहायला आवडेल यावरही भाष्य केलं आहे. अर्थात ईसकाळला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीतून मांजरेकरांनी हे सगळे खुलासे केले आहेत. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणालेत मांजरेकर महाविकास आघाडीविषयी?(Big Boss Marathi 4 Host Mahesh Manjrekar speaks on Maharashtra Politics, Mahavikas Aaghadi)

बिग बॉस मराठी सिझन ४ येत्या २ ऑक्टोबर,२०२२ पासून सुरू होत आहे. बिग बॉसच्या यंदाच्या नव्या 'ऑल इज वेल' या नव्या संकल्पनेविषयी, बिग बॉसच्या घराविषयी, नव्या बदलांविषयी काही खुलासे झाले असले तरी अद्याप बिग बॉसमध्ये सामिल होणाऱ्या स्पर्धकांविषयी खुलासे होणं बाकी आहे. नुकतीच या शो च्या प्रमोशननिमित्तानं एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकरांनी मीडियाशी बिग बॉस मराठी ४ विषयी मनमोकळा संवाद साधला. या पत्रकार परिषदेत ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर मोठं भाष्य करुन गेले महेश मांजरेकर. म्हणाले,'सरकार पडणार,याची मला आधीच कुणकुण लागली होती...'

हेही वाचा: Big Boss Marathi 4: मांजरेकरांना बिग बॉसच्या घरात हवेयत संजय राऊत, म्हणाले...

मुलाखतीत मांजरेकरांना विचारण्यात आलं की,'त्यांना महाराष्ट्रातील राजकारणाविषयी काय वाटतं?', तेव्हा ते म्हणाले, ''खरं सांगू तर मला हे सरकार पडणार याची आधीच कुणकुण लागली होती. कारण जेव्हा तीन वेगवेगळे पक्ष,जे खरंतर वैचारिक पातळीवर एकमेकांपासून अगदीच विरोधी भूमिका घेऊन आतापर्यंत कार्य करत आलेत ते एकत्र आल्यावर टिकणं तसं अवघडच. आणि तसंही इतर वेळेला जी उठबस होते लोकांत,तेव्हा जे ऐकायचो त्यामुळे देखील मनात या सरकार विषयी शंकेची पाल चुकचुकलेली''.

हेही वाचा: 'Madhubala आणि दिलीप कुमार यांच्यातील नातं कृपया...', बायोपिकनं वाढवलं बहिणीचं टेन्शन

''तेव्हापासून वाटत होतं हे सरकार फार काळ टिकणार नाही...'',आणखीही बरंच बोललेत मांजरेकर महाविकास आघाडी सरकार विषयी. पण ते ऐकण्यासाठी मुलाखतीची लिंक वर बातमीत जोडली आहे. ती नक्की ऐका. अर्थात मांजरेकरांनी जे सरकार १ वर्षही टिकणार नाही असं वाटत होतं,ते त्याहून अधिक काळ टिकलं यासाठी महाविकास आघाडीचं कौतूकही केलं. आता मांजरेकर मनोरंजन क्षेत्रातलं मोठं प्रस्थ असले तरी राजकारणाशी, नेते मंडळींशीही त्यांचा जुना घरोबा आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानं कुणी नाराज,कुणी खुश होणार तर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगणार हे वेगळं सांगायला नकोच आपल्याला.