Big Boss Marathi 4: 'सांगकाम्या आहेस तू...',म्हणत तेजस्विनीनं प्रसादचा केला पाणउताराTejaswini Lonari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss Marathi 4 nomnation, 
 fight between tejaswini and prasad

Big Boss Marathi 4: 'सांगकाम्या आहेस तू...',म्हणत तेजस्विनीनं प्रसादचा केला पाणउतारा

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आटली बाटली फुटली हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये रोहित, प्रसाद, मेघा आणि त्रिशूल घरातील उर्वरित सदस्यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार आहेत. रोहित शिंदे याने निखिल राजेशिर्के याला नॉमिनेट करणार असून त्याचे कारण निखिलला अमान्य असल्याचे त्याने सांगितले. (Big Boss Marathi 4 nomnation, fight between tejaswini and prasad)

हेही वाचा: Big Boss 16:विनर म्हणून सुम्बुलकडेच पाहिलं जात होतं,पण पहिल्याच भागात अभिनेत्रीनं खाल्ली माती

रोहितने स्पष्टीकरण देखील दिले "its Not a Groupism". या नॉमिनेशन प्रक्रियेबाबत आज प्रसाद आणि रुचिरामध्ये चांगलीच चर्चा रंगणार आहे. आता नक्की ते काय चर्चा करणार आहेत ते कळेलच. दुसरीकडे, नॉमिनेशनच्या प्रक्रियेमुळे तेजस्विनी आणि प्रसादमध्ये खटके उडायला सुरुवात होणार आहे.

हेही वाचा: Big Boss 16: 'हा तर गरिबांचा हृतिक..',गौतमला सुनावताना रॅपरच्या भडकलेल्या चाहत्यांची घसरली जीभ

तेजस्विनी प्रसादाला म्हणाली, "तू जे काय बनवणार आहेस ते positivity ने बनव, कटकट नको करुस, सांगकाम्या आहेस तू... आणि वाद वाढतच गेला... त्यावर अपूर्वाने देखील तिचे मत मांडले, "ह्याला हे सांगू नको, त्याला ते सांगू नको... याला काहीच सांगायचे नाही.

हेही वाचा: Big Boss 16: 'हिला पैसे मिळाले की आली...', साजिद खानचं समर्थन कश्मिराला भोवलं, नेटकरी भडकले...

आता ही भांडणं लोकांचं मात्र मनसोक्त मनोरंजन करणार आहेत. तेव्हा बघूया पुढे काय घडलं त्यासाठी बिग बॉस मराठी कलर्स मराठीवर सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा पाहता येईल अन् मनोरंजन दुपटीनं अनुभवता येईल.