esakal | सगळ्यांसमोर किस करणारच होता तेवढ्यात....
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss 14 eijaz khan and pavitra punia tried to kiss each other video goes viral

एजाज आणि पवित्राचा तो व्हिडिओ विरल भियानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्हायरल केला आहे.

सगळ्यांसमोर किस करणारच होता तेवढ्यात....

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बॉसमधील लोकप्रिय जोडी म्हणून प्रसिध्द असलेल्या एजाज खान आणि पवित्रा पुनियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. एजाज आपल्या काही कारणांमुळे त्या स्पर्धेतून बाहेर पडला. तर पवित्राला प्रेक्षकांनी नाकारल्याचे दिसून आले. असे जरी असले तरी त्या दोघांच्या टीआरपीमध्ये काही एक फरक पडलेला नाही.

त्याचं झालं असं की, एजाजला सगळ्यांसमोर पवित्रा पूनियाला किस करायचं  होतं. त्या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एजाजनं पवित्राला किस करायचा दोन ते तीनवेळा प्रयत्नही केला. मात्र तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की, आपण एका पत्रकार परिषदेत आहोत ते. कदाचित चर्चा व्हावी या उद्देशानं त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल होऊ दिला असल्याची चर्चा आहे. बिग बॉसचा यंदाचा सीझन त्या दोघांच्या प्रेमकहाणीनं रंगला होता. दोघांच्या चाहत्यांमध्येही त्यांची लव स्टोरी चांगलीच लोकप्रिय झाली होती. शो च्या दरम्यानही त्या दोघांनी आपल्या प्रेमाची कबूली दिली होती.

एजाज आणि पवित्राचा तो व्हिडिओ विरल भियानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्हायरल केला आहे. त्यात ते दोघेजण एकमेकांना किस करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या त्या व्हिडिओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. त्याला लाईक्स आणि कमेंट करुन चाहत्यांनी त्या दोघांच्या प्रेमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : लहान बाळासोबत करीना व तैमुर; काय आहे 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य?

हेही वाचा : 'जात महत्त्वाची नसून..'; रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत 

सोशल मीडियाच्या माध्यमातून एजाज आणि पवित्रा हे दोघेजण चर्चेत असतात. त्याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. ते दोघेजण आता लग्न करणार आहेत असे त्यानं एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले होते. एजाजानं पवित्राला प्रपोझ करताना म्हटले होते की, प्रेम ही खूप पवित्र भावना आहे. प्रेमात पडल्यानंतर येणारा अनुभव याबद्दल शब्दांत काही सांगता येणार नाही. भलेही आम्ही बिग बॉसचा भाग असताना भांडलो असेल मात्र आमच्यात प्रेमही तितकेच आहे. एकमेकांविषयीचा आदर आमच्यात आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतरही तो कायम राहिला. आणि आम्ही आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.  
 

loading image