राकेश बापटसोबत ब्रेक अपवर शमिताची प्रतिक्रिया, 'दरवेळी....'

बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय (Entertainment news) असणारे कपल्स म्हणून शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापटचं (Rakesh bapat) नाव घेतलं जातं.
Shamita Shetty
Shamita Shetty

Bigg Boss 15: बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय (Entertainment news) असणारे कपल्स म्हणून शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापटचं (Rakesh bapat) नाव घेतलं जातं. यंदाच्या सीझनमध्ये या दोन्ही सेलिब्रेटींनी चाहत्यांचे मनोरंजन केले. दरम्यान, त्यांच्यातील वादही अनेकदा रियॅलिटी शोच्या निमित्तानं पुढे आला होता. आता त्या दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यावर शमिता शेट्टी चांगलीच वैतागली (Viral News) आहे. त्यावर तिनं नेटकऱ्यांना खरं काय ते सांगितले असून नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारुन हैराण केल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपासून त्यांच्यातील नातं आता संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शमिता शेट्टी राकेश बापटच्या कुटूंबासमवेत क्वॉलिटी टाईम स्पेंड करत असल्याचे दिसून आले होते. तेव्हापासून नेटकऱ्यांनी हे दोघेही लग्न कऱणार असा अंदाज व्यक्त करत होते. प्रत्यक्षात कुठे माशी शिंकली हे माहिती नाही. मात्र आता या दोन्ही सेलिब्रेटींमध्ये वाद होत असल्याचे सुत्रांनी सांगितलं आहे. ही बातमी इतक्या वेगानं पसरली की, त्याची दखल शमिताची मोठी बहिण शिल्पा सहित सगळ्या कुटूंबाला घ्यावी लागली आहे. शिल्पानं देखील या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं आहे. अखेर शमिताला यासगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. शमिताला एका पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका मांडावी नेटकऱ्यांना सांगावी लागली आहे.

Shamita Shetty
Video Viral: युद्ध परिस्थितीतही युक्रेनियन सैनिक म्हणतायत Don’t Worry Be Happy!

शमिता म्हणाली, दरवेळी नेटकरी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आमच्याविषयी बोलत असतात. मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही. लोकांना काय बोलावे हे कळत नाही. सोशल मीडियावर बसून ते काहीही बोलत असतात. त्यांना आमच्या घरात काय चालले आहे हेही माहिती असते. ते कसे हेच मला कळत नाही. ते काहीही अंदाज बांधतात. हे सगळं मी माझ्या बहिणीच्या प्रकरणावरुन पाहिलं आहे. असेही एका मुलाखतीमध्ये शमितानं सांगितले होते. जेव्हा शिल्पाच्या पतीला राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली होती तेव्हा त्याचा त्रास शमिताही झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com