Bigg Boss : बिग बाॅसच्या घराचे फोटो लिक, सीझन १६ च्या थीमवर मोठे अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Season And Salman Khan

Bigg Boss : बिग बाॅसच्या घराचे फोटो लिक, सीझन १६ च्या थीमवर मोठे अपडेट

काही महिन्यांची प्रतिक्षा आणि पुन्हा टीव्हीवरील सर्वात विवादित रिअॅलिटी शो बिग बाॅस १६ (Bigg Boss Season 16) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानच्या (Salman Khan) शोचे आतील तपशील जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. आम्ही जर तुम्हाला सांगितले, की सीझन १६ मध्ये बिग बाॅसचे घर कसे दिसेल आणि शोची थीम काय असेल याबाबतचा खुलासा झाला असून त्याविषयी ऐकून तुम्ही आवाक् होऊन जाल. (Bigg Boss 16 House First Photo Leak Very Soon Salman Khan Show On Air)

हेही वाचा: Sonalee Kulkarni : परीक्षकाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी

बिग बाॅस १६ ची थीम ?

बिग बाॅस सिझन १६ ची जोरात तयारी सुरु आहे. अनेक मोठ्या नावांची चर्चा सुरु आहे. गेल्या वर्षीचा शो जंगल थीमवर आधारित होता. यापेक्षा हटके यंदा बिग बाॅसच्या घराची थीम पाण्यावर आधारित राहणार आहे. टेली चक्करने आपल्या वृत्तात सूत्रांचा हवाला देत ही माहिती दिली आहे. घर निळ्या रंगाने रंगलेले असेल. पाण्यातील जलचरांचे सगळ्या बाजूंनी पोस्टर्स लावलेले असतील. पूर्ण शोचा मध्यवर्ती संकल्पना पाणी राहणार आहे.

हेही वाचा: रणवीर सिंगच्या न्यूड फोटोवर आलिया भटची प्रतिक्रिया; म्हणाली, नकारात्मक...

सलमानने शूट केला प्रोमो

सलमान खानच्या चित्रीकरणाचा बिहाईंड द सीनचे फोटो समोर आले आहे. यात बिग बाॅसच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. सलमानने प्रोमोचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रोमो प्रदर्शित केला जाईल. हा कार्यक्रम १६ आॅक्टोबरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यंदाही रिअॅलिटी शोचे सलमान खानच सूत्रसंचालन करणार आहे.

Web Title: Bigg Boss 16 House First Photo Leak Very Soon Salman Khan Show On Air

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top