Bigg boss 16: बिग बॉसच्या घरात होणार 'प्रकृती'चा दंगा! तो व्हिडिओ होता चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg boss 16 News

Bigg boss 16: बिग बॉसच्या घरात होणार प्रकृतीचा दंगा! तो व्हिडिओ होता चर्चेत

Bigg Boss 16 News: टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉसच्या 16 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. सध्या या रियॅलिटी शोमध्ये कुणाची इंट्री होणार याची चाहत्यांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. गेल्या काही (Tv Entertainment News) वर्षांपासून बिग बॉसची लोकप्रियता वाढत चालल्याचे दिसून आले आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या होस्टिंगचा तडका असणारा हा रियॅलिटी शो चाहत्यांच्या मस्ट वॉच शो च्या यादीत समाविष्ट असणारा शो आहे.

आता बिग बॉसच्या घरात अभिनेत्री प्रकृती मिश्रा सहभागी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रकृती ही टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. यापूर्वी ती तिच्या वादग्रस्त वक्तव्य आणि वागणं यामुळे अनेकांच्या रडारवर आली होती. वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. मनोरंजन क्षेत्रामध्ये प्रकृती नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. उडिया मनोरंजन विश्वामध्ये प्रकृतीचं नाव घेतलं जातं.

प्रकृती ही संगीतकार मनमाथ मिश्रा यांची मुलगी आहे. भुवनेश्वर येथे शिकलेल्या प्रकृतीनं कामाच्या निमित्तानं मुंबईत पाऊल ठेवले. तिनं मुंबईत पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं. तिनं डान्स मास्टर गंगाधर प्रधान यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले आहे. एक बालकलाकार म्हणून तिनं सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी ती कॅमेऱ्याला सामोरी गेली होती. ती सुरुवातीला सबता मा आणि सुना पुकारीमध्ये दिसली होती. त्यानंतर तिनं काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 16: 500 कारागीर, 6 महिने 8 तास काम, बिग बॉसचं घर बनवणं अवघड!

काही महिन्यांपूर्वी प्रकृती चर्चेत आली होती ती तिच्या अवैध प्रकारच्या व्हिडिओमुळे. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे तिचे चाहतेही अवाक झाले होते. त्यांनी तिच्यावर कमेंट करुन नाराजी व्यक्त केली होती. प्रकृतीवर तिच्या एका सहकलाकाराच्या पत्नीनं अवैध संबंध ठेवल्याचे आरोप केले होते. त्यावरुन ती चर्चेत आली होती.

हेही वाचा: HBD Anushka Sharma: टॅलेंट बघून करण जोहरनेही मान्य केली होती चूक,एके काळी म्हणाला होता..

Web Title: Bigg Boss 16 Prakruti Mishra Now Contestants Private Video Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..