Samantha Prabhu:समंथानं दिली गूडन्यूज! चाहत्यांच्या आंनदाला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samantha Ruth Prabhu

Samantha Prabhu:समंथानं दिली गूडन्यूज! चाहत्यांच्या आंनदाला उधाण

समंथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची लोकप्रियता ही केवळ दाक्षिणेतच नव्हे तर भारतभर पसरली आहे. संमथा मागील काही दिवसांपासून तिच्या शांकूतला या चित्रपटामुळं चर्चेत आहे मात्र त्याबरोबरच तिला झालेल्या आजारामुळेही तिचा चर्चा होत असते. यापूर्वी, सामंथा रुथ प्रभूने तिच्या चाहत्यांना सांगितले होते की ती मायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे.

मात्र आता समंथा तिच्या सामान्य जीवनात परत येत दिसत आहे. समंथाने आज तिचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा चमकत आहेहा समांथाचा सन किस केलेला फोटो आहे. आपल्या आवडत्या समंथाचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना खुप आंनद झाला आहे. सामंथा अशा प्रकारे आनंदी आणि फिट असल्याचे पाहून चाहत्यांनी तिला खुप शुभेच्छा दिल्या आहेत.

समंथाची ही पोस्ट पाहिल्यानंतर ती हळूहळू आजारातून बरी होत असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. समांथाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचे डोळे मिटलेले असून चेहऱ्यावर हलके हसू पसरले आहे. या फोटोसोबत सामंथाने लिहिले कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'प्रकाशाचा शोध संपला.( Find the light)'

समांथाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊसच पाडला आहेत. कमेंट बॉक्समध्येही चक्क संमथाला अनेक लग्नाचे प्रस्ताव येत आहेत. एका यूजरने लिहिलयं की, 'प्रकाश तुझ्यातच आहे. तू चमकणारा तारा आहेस. तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'आम्ही तुझ्या अशा पोस्ट खूप मिस करायचो. अखेर, 2023ने तुझ्या चेहऱ्यावर हासू तर आणलं. एकाने लिहिले की, 'सूर्य चंद्रावर प्रेम करत आहे.', 'तुला प्रकाशाची गरज नाही, तू स्वतः रोशनी आहेस.'

यापूर्वी समंथाला तिच्या लूकसाठी सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. यावर समंथा म्हणाली होती की, 'मी प्रार्थना करते की, तुम्हाला माझ्यासारख्या आजारांचा आणि औषधांचा सामना करावा लागू नये. आणि तुमच्या ग्लोसाठी माझ्याकडून थोडं प्रेम. सामंथाशिवाय वरुण धवननेही ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर दिले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, समंथा लवकरच 'सिटाडेल' या सिरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'शाकुंतलम' या चित्रपटातही दिसणार आहे.