Rakhi Sawant Video: राखीचा काय भरोसा नाय! सेल्फी काढणाऱ्यांचा फोनचं घेऊन पळाली बया, अन् नंतर...

राखी सावंतच्या गाडीजवळ गेल्यावर तिचे चाहते त्यांचे फोन विचारू लागले
Rakhi Sawant, lawrence bishnoi, salman khan news, rakhi sawant news, rakhi sawant threatens
Rakhi Sawant, lawrence bishnoi, salman khan news, rakhi sawant news, rakhi sawant threatensSAKAL

Rakhi Sawant Video News: बिग बॉस फेम राखी सावंत सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. राखीच्या अंतरंगी हरकती काही संपायचं नाव घेत नाहीत. राखीचे ड्रामे सोशल मीडियावर कायमच गाजतात.

राखी कधी एअरपोर्टवर मीडियासोबत मस्ती करत असते. तर कधी वेगळाच सॉंग व्हिडिओ बनवत चर्चेत असते.

राखीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरल्याशिवाय राहणार नाही.

(bigg boss fame actress Rakhi sawant ran away with the selfie takers' phones, and then...)

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राखीचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा समोर आलाय. यामध्ये ती एका इव्हेंटमध्ये पोहोचली आहे, जिथे काही लोक तिच्यासोबत सेल्फी घेत होते. मात्र राखीने त्यांचा फोन हिसकावून पळ काढला.

राखीचे फॅन त्यांच्या फोनवर तिच्यासोबत सेल्फी घेत होते. यादरम्यान, ती त्यांना सांगते की कोण सेल्फी घेत आहे.

आणि बोलता बोलता ती सर्वांचे फोन हिसकावून घेते. सर्वांचे फोन हिसकावून ती आपल्या कारमध्ये जाते.

राखी सावंतच्या गाडीजवळ गेल्यावर तिचे चाहते त्यांचे फोन विचारू लागले. पण राखी म्हणते- मी देणार नाही. तुम्ही सेल्फी घेतला आहे का? तुम्ही सेल्फी काढलात आणि पुन्हा घेणार नाही का? कॅमेऱ्यासमोर पाहिल्यावर सॉरी म्हणा. यानंतर ती एकाचा फोन परत करते आणि दुसऱ्या चाहत्याच्या फोनसोबत सेल्फी घेते. आणि मग ती बाय म्हणुन निघून जाते. राखी आणि तिच्या अतरंगी काही संपायचं नाव घेत नाहीत.

Rakhi Sawant, lawrence bishnoi, salman khan news, rakhi sawant news, rakhi sawant threatens
Onkar Bhojane: गोस्वामी सरांची "ती" गोष्ट कायम लक्षात.. हास्यजत्रेतून बाहेर पडल्यावर ओंकार पहिल्यांदाच हे बोलला
Rakhi Sawant, lawrence bishnoi, salman khan news, rakhi sawant news, rakhi sawant threatens
Prajakta Mali: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताने 'लग्नाळुंसाठी' केली ही मोठी घोषणा

राखीला काहीच दिवसांपुर्वी प्रिन्स मावी नावाच्या व्यक्तीकडून दोन धमकीचे ईमेल मिळाले. या इमेल मध्ये त्याने आपण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा आणि गोल्डी ब्रार ग्रुपचा मेम्बर असल्याचा दावा केला होता.

पहिला ईमेल राखीला 18 एप्रिल रोजी सकाळी 7.22 वाजता पाठवण्यात आला होता आणि दुसरा ईमेल 18 एप्रिल रोजी दुपारी 1.19 वाजता आला होता. आता या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com