esakal | Marathi Bigg Boss : विदर्भाचा शिव ठरला 'बिग बॉस 2'चा महाविजेता!
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Bigg Boss : विदर्भाचा शिव ठरला 'बिग बॉस 2'चा महाविजेता!

विदर्भाच्या शिवने 16 जणांना 'सोट्टे' दिले अन् ठरला 'बिग बॉस 2'चा महाविजेता!

Marathi Bigg Boss : विदर्भाचा शिव ठरला 'बिग बॉस 2'चा महाविजेता!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : अनेक हटके कारणांमुळे चर्चेत असलेल्या मराठी 'बिग बॉस सीझन 2'ची ग्रँड फिनाले आज थाटामाटात पार पडला. या पर्वाचा महाविजेता ठरला आहे अमरावतीचा शिव ठाकरे! बिग बॉसचा शंभर दिवसांचा खडतर प्रवास पूर्ण करून या शिवने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आज (ता. 1) आपलं नाव कोरले. अभिनेत्री नेहा शितोळे आणि शिव ठाकरे यांच्यात अंतिम फेरी रंगली आणि शिव 'बिग बॉस 2' जिंकला.

शिव ठाकरेला बिग बॉसच्या ट्रॉफीसह 17 लाख रुपयांचा धनादेश मिळाला आहे. जिंकल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर नेहा शितोळे, आणि तिसरा क्रमांक विणा जगतापने पटकावला आहे. 

बिग बॉसने स्पर्धकांना रडवलं

नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, वीणा जगताप, शिव ठाकरे, किशोरी शहाणे आणि आरोह वेलणकर या कलाकारांमध्ये बिग बॉसची अंतिम फेरी रंगली. भरपूर वाद, भांडणं, गैरसमज अशा अनेक कारणांमुळे बिग बॉसचा हा सीजन चांगलाच गाजला होता. तसेच प्रेम, घट्ट मैत्री आणि आपुलकीमुळे हा सीजन चर्चेत आला होता. अंतिम फेरीतील 5 जणांना मागे टाकत शिव 'बिग बॉस सीझन 2' चा विजेता ठरला आहे.

बिग बॉसनंतर शिवानी सुर्वेच्या सिनेमांचा डबल धमाका 

शिव वीणाची केमिस्ट्री किंवा नेहा-शिवानी-माधवचा ट्रायो, किशोरीताईंचं सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीनं राहणं, आरोहचं रोखठोक बोलणं अशा अनेक कारणांमुळे या वेळेचा बिग बॉस बिग बॉस सीझन चर्चेत आला होता. तर शेवटच्या आठवड्यापर्यंत सदस्य म्हणून नाही, तर पाहुणे कलाकार म्हणून राहिलेल्या अभिजीत बिचुकले यांनी 'बिग बॉस सीझन 2' मध्ये चांगलीच रंगत आणली. अंतिम फेरीसाठी सर्व घराबाहेर पडलेले स्पर्धकही आले होते. अंतिम फेरीतील स्पर्धकांचे तसेच बाहेर पडलेल्या स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्स आणि गाणीआजच्या फायनलमध्ये हिट ठरली.

अॅक्शन मसाला अन् थ्रिलरवाला साहो

अमरावतीचा शिव 'बिग बॉस 2'चा विजेता!
रोडीज फेम आणि शिव ठाकरेने खेळात खूप कमी वेळातच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आपल्या खास अमरावती स्टाईलमुळे शिव कायमच चर्चेत राहिला. बिग बॉसच्या घरात शिवचं वीणासोबत एक छान नातं जमलं होतं. तसंच अभिजित केळकर आणि वैशाली म्हाडे यांच्यासोबतही शिवचा बॉण्ड मजबूत होता. नेहा शितोळेसारख्या तगड्या स्पर्धकाला मागे टाकत शिवने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरले.

महेश मांजरेकरांच्या निवेदनामुळे 'बिग बॉस'ला चार चाँद
मराठी बिग बॉस निवेदन दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर आपल्या खास शैलीत करतात. स्पर्धकांना रागवणं असू देत किंवा त्यांचं कौतुक करणं असू देत ते कायमच स्पर्धकांची शाळा घेत असतात. मांजरेकर नेहमीच स्पर्धकांना बद्दल बोलतात पण आजच्या अंतिम फेरीत स्पर्धक महेश मांजरेकरांबद्दल बोलले आणि त्यांनी मांजरेकरांच्या निवेदनाचं खूप खूप कौतुक केलं.

'बिग बॉस सीझन 2' मधील सहभागी कलाकार
शिव ठाकरे, वीणा जगताप, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, अभिजीत केळकर, वैशाली म्हाडे, अभिजीत बिचुकले, पराग कान्हेरे, पराग कान्हेरे, रुपाली भोसले, सुरेखा पुणेकर, विद्याधर जोशी, दिगंबर नाईक, माधव देवचक्के, हीना पांचाळ, मैथिली जावकर. 
यातील आरोह वेलणकर व हीना पांचाळ हे वाईल्ड कार्ड एन्ट्रीतून घरात आले होते. तर शिवानी सुर्वे व अभिजित बिचुकले हे काही वैयक्तिक कारणांमुळे घराबाहेर गेले होते व पुन्हा घरात परतले.

loading image
go to top