Sneha wagh and aavishkar
Sneha wagh and aavishkar

BBM 3: "घटस्फोटानंतर मी कबीर सिंग झालो होतो"; स्नेहाबद्दल आविष्कार व्यक्त

अगदी पहिल्या दिवसापासून ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Published on

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये Bigg Boss Marathi 3 विविध क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. याच घरात अभिनेत्री स्नेहा वाघ Sneha Wagh आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकरसुद्धा Aavishkar Darwhekar एकत्र राहत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये, आविष्कार त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच खुलेपणाने व्यक्त होताना दिसला. जय दुधाणेशी बोलत असताना आविष्कारने त्याच्या आणि स्नेहाच्या घटस्फोटाविषयी सांगितलं. "स्नेहाने माझ्यावर बरेच आरोप केले होते. घटस्फोटानंतर मी व्यसनाधीन झालो. मी त्यावेळी अक्षरश: कबीर सिंग झालो होतो," असं तो जयला सांगतो.

आविष्कारला उत्तर देताना जय म्हणतो, "स्नेहा घरातील सर्वांत शांत व्यक्ती वाटते." त्यावर आविष्कार म्हणतो, "ती सायलेंट नाही तर वायलेंट आहे. तुला लवकरच समजेल." बिग बॉसच्या घरात स्नेहा स्पर्धक म्हणून येणार असल्याचं माहित नसल्याचं आविष्कारने यावेळी सांगितलं.

Sneha wagh and aavishkar
Video: 'मी राज कुंद्रासारखी दिसते का?'; पत्रकारांना शिल्पा शेट्टीचा प्रतिप्रश्न
Sneha wagh and aavishkar
'अरे, कुठे नेऊन ठेवली ही मालिका'; 'अरुंधती'च्या वागण्यावर भडकले प्रेक्षक

स्नेहाचं वैवाहिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. तिने दोनदा लग्न केलं असून दोनदा तिचा घटस्फोट झाला आहे. वयाच्या १९व्या वर्षी स्नेहाने आविष्कारशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. स्नेहाने आविष्कारवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. "मी खूप वेदना सहन केल्या आहेत. पतीच्या मारहाणीला बळी पडणाऱ्या महिलांबद्दल मला खूप वाईट वाटतं", असं ती एका मुलाखतीत म्हणाली. आविष्कारला घटस्फोट दिल्यानंतर सात वर्षांनी स्नेहाने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. इंटेरिअर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र हे लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. आठ महिन्यांतच स्नेहा आणि अनुराग विभक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com