Akshay Kelkar: भाऊ असावा तर असा.. अक्षय केळकरच्या बहिणीच्या लग्नात घडली हि खास गोष्ट

बहीण श्रद्धाच्या लग्नात अक्षयचे इंडस्ट्रीतले कलाकार मित्र मैत्रीण उपस्थित होते.
akshay kelkar, akshay kelkar sister wedding, bigg boss marathi
akshay kelkar, akshay kelkar sister wedding, bigg boss marathiSAKAL

Akshay Kelkar Sister Wedding: बिग बॉस मराठी 4 चा विजेता झाला अक्षय केळकर. अक्षयच्या बहिणीच नुकतंच लग्न झालंय. अक्षय केळकरची बहिण श्रद्धा हीच काल २६ जानेवारीला थाटामाटात लग्न झालं. श्रद्धाच्या संपूर्ण लग्नविधींमध्ये अक्षयने धम्माल केली. अक्षयच्या बहिणीच्या लग्नात एक अनोखी गोष्टी घडली. ती वाचून तुम्ही म्हणतात भाऊ असावा तर असा...

(bigg boss marathi 4 winner akshay kelkar sistar wedding)

akshay kelkar, akshay kelkar sister wedding, bigg boss marathi
Akshay Kelkar: आईनेच लावुन दिली सेटिंग! खुप मजेदार आहे ‘बिग बॉस’ विजेता अक्षयच्या पहिल्या प्रेमाची कहाणी

झालं असं कि.. अक्षयची बहीण श्रद्धा लग्नबंधनात अडकली. श्रद्धा जेव्हा बिग बॉसच्या घरात अक्षयला भेटायला आलेली तेव्हा तिने माझ्या लग्नात मला ट्रॉफी पाहिजे, अशी इच्छा तिने अक्षय जवळ बोलून दाखवली. पुढे अक्षयने त्याच्या जबरदस्त गेमने बिग बॉस मराठी ४ चं विजेतेपद पटकावलं. त्यामुळे अक्षयच्या बहिणीची इच्छा पूर्ण झाली. लग्नात अक्षयने प्रेमाने तिची ट्रॉफी बहिणीला दिली. याशिवाय अक्षयची बहीण श्रद्धाने अक्षयने जिंकलेली बिग बॉस मराठी ४ ची ट्रॉफी तिच्या लग्नाच्या रुखवतात ठेवलेली.

akshay kelkar, akshay kelkar sister wedding, bigg boss marathi
Apurva Gore: नटखट, मस्तीखोर, रोमँटिक आणि सर्वांची लाडकी 'ईशा'

बहीण श्रद्धाच्या लग्नात अक्षयचे इंडस्ट्रीतले कलाकार मित्र मैत्रीण उपस्थित होते. बिग बॉस मधली अक्षयची बेस्ट फ्रेंड अमृता धोंगडे लग्नाला उपस्थित होती. याशिवाय अभिनेत्री समृध्दी केळकर सुद्धा लग्नाला हजार होती. अशाप्रकारे भावाने बिग बॉस जिंकून स्वप्न पूर्ण केल्याने अक्षयची बहिण सुद्धा लग्नात एकदम आनंदात दिसली. लाडक्या बहिणीच्या हळदीला आणि लग्नाला अक्षयने सुद्धा मजा केली.

अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता झाला आणि ट्रॉफी घरी घेवुन गेला. मात्र बिग बॉसच्या त्या ट्रॉफीवर आपलं नावं कोरणं हे त्याच्यासाठी सोपं नव्हतं. अक्षयच्या वडीलाचं नावं जयेंद्र केळकर तर त्यांच्या आईचं नाव कल्पना केळकर आहे. अक्षय केळकरचे वडील रिक्षा चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचे. विषेश म्हणजे अक्षय त्याच्या वडिलांच्या रिक्षातूनच बिग बॉसच्या सेटवर पोहोचला होता. आज तो बिग बॉसचा विजेता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com