'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूरचा पार पडला साखरपुडा

sai lokur
sai lokur

मुंबई- छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेला आणि घराघरात पोहोचलेला 'बिग बॉस' मराठीचा पहिला सिझन चांगलाच चर्चेत होता. मराठीत पहिल्यांदाच 'बिग बॉस' सुरु केल्याने शोमधील स्पर्धकही तितकेच चर्चेत आले होते. अभिनेत्री सई लोकूरने देखील  या शोमधून तिचा चाहतावर्ग निर्माण केला. विशेष म्हणजे मेघा धाडे आणि पुष्कर जोग यांच्यासोबत असलेली तिची मैत्री या सिझनमधील चर्चेचा विषय होता. 'बिग बॉस'नंतर सई लोकूर सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह होती. काही दिवसांपूर्वीच तिने ती प्रेमात पडली असून तिला जोडीदार मिळाला असल्याचं एक फोटो शेअर करत सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच तिने तिचे मेहंदीचे फोटो शेअर केल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. सईच्या लग्नाची तयारी, सई विवाहबंधनात अडकणार अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. आता फायनली सईने साखरपुडा केल्याचं जाहीर करत जोडीदारासोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. 

अभिनेत्री सई लोकूरने इंस्टाग्रामवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. सईच्या जोडीदाराचं नाव आहे तिर्थदीप रॉय. सईने हे फोटो शेअर करत म्हटलंय, 'माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे.' सई या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसतेय. पिवळ्या आणि लाल रंगाच्या लेहेंग्याचं कॉम्बिनेशन सईने तिच्या पेहरावामध्ये केलं आहे. तसंच तिर्थदीपनेही पिवळ्या रंगाचा पेहराव केला आहे. या फोटोमधील सईची स्माईल पाहूनंच ती किती आनंदी आहे याचा अंदाज येतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I love you and that's the beginning and end of everything @tirthadeep_roy #mydimpledguy #engaged #oneforlife

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

सईचे चाहते तिच्या जोडीदाराविषयी जाणून घेण्यासाठी खूप दिवसांपासून उत्सुक होते कारण याआधी तिने त्याच्यासोबतचे पाठमोरे फोटो शेअर करत प्रेक्षकांमध्ये याविषयीची उत्सुकता ताणुन धरली होती. आज सईने साखरपुडा पार पडल्याचं सांगत प्रेक्षकांना आनंदाचा धक्काच दिलाय. तिच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि तिचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.    

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mujhe apni preet vich rang de 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

bigg boss fame actress sai lokur engaged with tithdeeproy   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com