
कॉन्सर्ट MC Stan चा पण गाजवला शिव अन् सुंबुलनं...नाटू नाटूवर भन्नाट डान्स! व्हिडिओ व्हायरल
बिग बॉस जरी संपलं असलं तरी या शोमधील मंडली ही बाहेरही अजून तितकिच चर्चेत आहे.त्यांना नेहमीच पापाराझींना पोज देतांना दिसतात. या मंडलीचा जीव आणि बिग बॉस 16 चा विनर एमसी स्टॅन सध्या भारत दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यादरम्यान तो पुर्ण भारतात त्याचे शो करणार आहे. ३ मार्चपासून सुरू झालेला त्यांचा दौरा ७ मे २०२३ रोजी संपणार आहे. त्यांने आधी पुण्यात आणि नंतर मुंबईत ५ मार्चला कॉन्सर्ट केला. यावेळी त्याच्या कॉन्सर्टला चाहत्यांची तुफान गर्दी होती. यावेळी त्यांचे सर्व मित्र आणि हजारो चाहते पोहोचले.
त्याच्या या शोमध्ये 'मंडली'ही दिसली. शिव ठाकरे, सुंबुल तौकीर खान आणि निमृत कौर अहलुवालिया यांच्याशिवाय मन्या सिंगही पोहोचले. या सगळ्यांनी कॉन्सर्टमध्ये धमाल केली. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मात्र यावेळी स्टॅनच्या शोमध्ये सगळ्यामध्ये सुंबुल आणि शिव यांची केमेस्ट्रीही दिसली. दोघांनी मस्त डान्स केला. दोघेही 'नाटू' 'नाटू'ची हुक स्टेप करताना दिसले. मात्र, यादरम्यान दुसरा कोणीही स्पर्धक दिसत नाही. निमृत कौरने कदाचित या दोघांचा व्हिडिओ शूट केला आहे. दोघांनीही या गाण्यावर भन्नाट डान्स केला.
आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांना सुंबुल आणि शिवची मैत्री खुप आवडत आहे. स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये शिव आणि सुंबुलनंच मैफिल लुटली असंही नेटकरी म्हणतं आहे.
तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मन्या सिंह सुंबुल तौकीर खान आणि निमृत कौर अहलुवालियासोबत दिसत आहे. यावेळी सुंबुल आणि निमृतच्या नात्यांन पुन्हा नेटकऱ्यांच मन जिंकलं.
यापूर्वी 3 मार्च रोजी पुण्यात स्टॅनने परफॉर्मन्स दिला होता. त्यांने शोची तिकिटे बुक करण्याची लिंकही दिली होती, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल. त्याच्या शोच्या तिकिटाची किंमत फक्त 499 रुपये आहे, जी परवडणारी किंमत आहे. आता त्याचा पुढिल शो हैदराबादला असणार आहे.