सूरज पंचोलीचं बुडतं करियर वाचवण्यासाठी सलमानचा नवा प्लॅन? Bigg Boss OTT 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss OTT 2 Sooraj Pancholi will appear in Salman Khan's show After getting relief in Jiah Khan's death case

Bigg Boss OTT 2: सूरज पंचोलीचं बुडतं करियर वाचवण्यासाठी सलमानचा नवा प्लॅन?

टिव्हि मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस आता या बिग बॉसचा ओटीटी सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन 17 जूनपासून जिओ सिनेमावर प्रसारित होणार आहे.

यावेळचा बिग बॉसचा ओटीटी करण जोहर नाही तर सलमान खान होस्ट करणार आहे. सलमान खान पहिल्यांदाच बिग बॉसचे डिजिटल व्हर्जन होस्ट करणार असल्यानं चाहते उत्सूक आहेत.

सलमानने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो बिग बॉस ओटीटीच गाणं गाताना दिसत आहे.

चाहत्यांनी ओटीटीवर सलमानचे जबरदस्त स्वागत केले आहे आणि आता या शोला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद शोच्या स्पर्धकांबाबतचे अपडेट्स समोर येत आहेत.

आता अशी बातमी आली आहे की सीमा टपरियाचे नाव या शोसाठी कन्फर्म झाले आहे आणि याशिवाय दुसरा महत्वाचा स्पर्धक म्हणुन सूरज पांचोली आणि योहानी यांना देखील या शो साठी अप्रोच करण्यातआलं असल्याच्याही चर्चा आहेत.

शोचे निर्माते सूरज पांचोलीला शोमध्ये घेण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे आता मनोरंजन विश्वात अनेक चर्चांना सुरवात झाली आहे.

या चर्चांच महत्वाच कारण आहे सुरज पांचोली ज्याची काही दिवसांपुर्वीच जिया खान आत्महत्याप्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या आधी सुरजनं सलमानच्याच 'हिरो' या चित्रपटातुन पदार्पण केले होते.

मात्र याचा उपयोग त्याच्या करियर फारसा झाला नाही. त्यामुळे आता सुरजच्या करियरला मदत व्हावी म्हणुन सलमान त्याला त्याच्या शोमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय की काय अशा चर्चा मनोरंजन विश्वात सुरु आहे.

कारण बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनने अनेक छोट्या कलाकारांना स्टार केले. ज्यांना पहिल्या सीझननंतर प्रचंड लोकप्रियता मिळली.

यामध्ये शोमधून बाहेर पडणारी उर्फी जावेद आघाडीवर आहे. तर बिग बॉस ओटीटी 1 करण जोहरने होस्ट केला होता. त्याच वेळी, दिव्या अग्रवाल या शोची विजेती ठरली.