आता पाकिस्तानात पुन्हा 'गदर' होणार! तारा सिंग लाहोरला पोहचतात शत्रूंची हवा टाईट.. Gadar 2 Teaser | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gadar 2

Gadar 2 Teaser: आता पाकिस्तानात पुन्हा 'गदर' होणार! तारा सिंग लाहोरला पोहचतात शत्रूंची हवा टाईट..

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेलचा गदर २ हा आता येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 'गदर' हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. आता सनी देओलचा चित्रपट तब्बल 22 वर्षांनंतर 'गदर' चित्रपटगृहात पुन्हा एकदा प्रदर्शित झाला आहे.

गदरच्या रिरिलिजला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाची टिझर रिलि केला आहे. गदर 2 च्या टीझरने रिलिज होताच खळबळ उडवून दिली आहे. याआधी हा टिझर थेटरमध्ये गदर पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांनी पाहिला आहे. ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरलही झाले होते.

मात्र आता हा टिझर अधिकृतरित्या प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

या टीझरची सुरुवात एका महिलेच्या दमदार आवाजाने होते.

'गदर 2' च्या टीझरची सुरुवातीला एक महिलेचा आवाज येतो ती म्हणते की, 'दामाद है ये पाकिस्तान का, उसको नारियल दो, टीका लगाओ, वरना लाहौर ले जाएगा'.

संवादानंतर सनी देओल अॅक्शन अवताराही दिसतो मात्र शेवटी तो खूप भावूक दिसत आहे. त्याचे डायलॉग सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले आहेत.

ई- टाइम्सच्या वृत्तानुसार, अनिल शर्मा यांच्या डोक्यात हा संवाद पहिला गदर बनवत असतांनाच होता मात्र त्यांनी त्याचा वापर चित्रपटात किंवा प्रमोशनमध्ये केला नाही. यावेळी हातपंपाच्या ऐवजी सनी बैलगाडीच्या चाकाने शत्रूंशी लढताना दिसतो.

सनी देओलचे दमदार संवाद ते अॅक्शन सिक्वेन्स पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत. आता 'गदर 2' चा टिझर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' या चित्रपटात सनी देओलशिवाय अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

गदरची टक्कर रणवीरच्या अ‍ॅनिमल आणि अक्षयच्या OMG2 सोबत होणार आहे.