esakal | चुकीच्या उपचारामुळे बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; डॉक्टरांवर केले आरोप

बोलून बातमी शोधा

Raiza Wilson

चुकीच्या उपचारामुळे बिघडला अभिनेत्रीचा चेहरा; डॉक्टरांवर केले आरोप

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनयविश्वात काम करणारे अनेक सेलिब्रिटी हे कॉस्मेटिक सर्जरीच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळतं. आजवर असंख्य अभिनेते व अभिनेत्रींनी सुंदर दिसण्याच्या मोहापायी प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत. त्यापैकी काहीजणींना त्या सर्जरीचा फटकासुद्धा बसला आहे. कॉस्मेटिक सर्जरीचा परिणाम त्यांच्या शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्यावरही झाला. अशीच एक घटना नुकतीच तामिळ अभिनेत्री रायझा विल्सन हिच्यासोबत घडली आहे. रायझाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. सर्जरीची गरज नसल्याचं सांगूनही डर्मेटॉलॉजिस्टने तिला बळजबरी काही औषधं दिल्याचं तिने या पोस्टमध्ये सांगितलं. चुकीच्या औषधांमुळे तिच्या उजव्या डोळ्याजवळ सूज आल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर तिने संबंधित डॉक्टरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्यास तिने टाळाटाळ केल्याचीही तक्रार रायझाने केली.

स्वत:चा फोटो पोस्ट करत रायझाने संबंधित डॉक्टरचं नावंही जाहीर केलं. 'चेहऱ्याच्या काही सामान्य उपचारासाठी मी काल डॉ. भैरवी सेंथिल यांना भेटले होते. त्यांनी आवश्यक नसतानाही माझ्यावर एक उपचारपद्धती केली आणि त्याचा परिणाम असा झाला. आज त्यांनी मला भेटण्यास आणि माझ्याशी बोलण्यासही नकार दिला. त्या शहराबाहेर गेल्याचं स्टाफने सांगितलं.'

हेही वाचा : 'फुटबॉल झाली आहेस'; म्हणून हिणवणाऱ्याला धनश्री कडगावकरचं सडेतोड उत्तर

img

हेही वाचा : 'सांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे?' सई ताम्हणकरच्या घराविषयीची पोस्ट चर्चेत

रायझाने तिचा अनुभव सांगताच अनेक नेटकऱ्यांनी तिला मेसेजेस केले. त्यांचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने लिहिलं, 'माझ्यासारख्याच समस्येला सामोरं गेलेल्या अनेकांनी मला मेसेज केले आहेत. हे खरंच त्रासदायक आहे.'

'वेलाइल्ला पट्टथारी २' या चित्रपटातून रायझाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यामध्ये तिने धनुष आणि काजोलसोबत भूमिका साकारली होती. तिने अर्जुन रेड्डी या चित्रपटाच्या तामिळ रिमेकमध्येही काम केलं आहे. याशिवाय 'बिग बॉस तामिळ'च्या पहिल्या पर्वात तिने भाग घेतला होता.