उद्योगपती 'नारायण मूर्तीं'चा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर  

Biopic on Narayan Murthy and Sudha Murthy
Biopic on Narayan Murthy and Sudha Murthy

नवी दिल्ली : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांची चलती असून हमखास यश मिळविण्याचा फॉर्म्युला म्हणून कित्येक निर्माते-दिग्दर्शक विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींवर चित्रपट बनविण्याकडे वळले आहेत. खेळाडू, चित्रपट कलाकार ते अगदी राजकारण्यांच्या जीवनाचा प्रवास आजवर विविध चरित्रपटांद्वारे उलगडण्यात आला आहे. आता यामध्ये भर पडणार आहे उद्योगपती नारायण मूर्तीं यांची!

इन्फोसिसच्या सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे जीवन लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक-दिग्दर्शक-निर्माता जोडी अश्विनी अय्यर-तिवारी आणि नितेश तिवारी चित्रपटाच्या पटकथेला अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत आहेत. हा चित्रपट तमिळ आणि हिंदी व्यतिरिक्त मूर्ती यांची मूळ भाषा असलेल्या कन्नडमध्ये तयार केला जाणार आहे. कलाकार अद्याप ठरलेले नसून, लवकरच त्याबाबतही माहिती मिळेल. 

शिक्षकाच्या घरी जन्म, आयआयटी कानपुर मधून मास्टर्स डिग्री ते 3 लाख कोटींचे बाजार भांडवल असलेली 'इन्फोसिस' बनविण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आणि आदरणीय आहे. या प्रवासात त्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी 10 हजार रूपये रुपये देणाऱ्या आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सुधा मूर्ती यांचा प्रवास देखील तितकाच रोमांचक आहे. त्यामुळे या दोघांचे आयुष्य चित्रपटाच्या रूपातून मोठ्या पडद्यावर पाहणे नक्कीच चांगली पर्वणी असणार आहे.

नारायण मूर्तींचा साधेपणा, काम मिळविताना त्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा, इन्फोसिसची गरुडभरारी याचे अनेक किस्से ऐकायला किंवा वाचायला मिळतात. मात्र, ते मोठ्या पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com