अरविंद केजरीवाल यांच्यावर बायोपिक? 'पंचायत' फेम जितेंद्र कुमार म्हणाला...

अभिनेता जितेंद्र कुमारनं 'शुभमंगल ज्यादा सावधान' हा सिनेमा तर 'पंचायत' वेबसिरीजमध्येआपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
Actor Jitendra Kumar And Delhi C M Arvind Kejriwal
Actor Jitendra Kumar And Delhi C M Arvind KejriwalGoogle

'पंचायत'(Panchayat) या ओटीटीवर(OTT)प्रदर्शित झालेल्या सीरिजमध्ये सचिवाची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेल्या जितेंद्र कुमार(Jitendra Kumar)ची एक सुप्त इच्छा आहे,जी त्यानं एका मुलाखती दरम्यान व्यक्त केली आहे. जितेंद्रला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांची व्यक्तिरेखा साकारायची आहे. आता 'पंचायत' चा दुसरा सीझन देखील आपल्या भेटीस येणार आहे. यानिमित्तानंच एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्रनं मनातील ही इच्छा बोलून दाखवली आहे. पंचायत प्रदर्शित होण्याआधी जितेंद्र कुमार 'शुभमंगल ज्यादा सावधान' या सिनेमात आयुषमान खुराना(Ayushmann Khurrana)सोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. समलिंगी रिलेशनशीपवर आधारित या सिनेमाचं कथानक होतं. यामध्ये आयुषमानसोबत जितेंद्रने साकारलेली भूमिकाही भाव खावून गेली होती.

Actor Jitendra Kumar And Delhi C M Arvind Kejriwal
ऑडिशन टेपमध्ये कार्तिकला 'त्या' अवस्थेत पाहून आईला बसला होता धक्का

जितेंद्रने 'पंचायत' च्या आगामी सिझनच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत आपल्या सिनेकरिअर विषयी संवाद साधताना एक मोठा खुलासा केला. जेव्हा त्याला विचारलं की जर एखादी बायोपिक करायची संधी तुला मिळाली तर तुला कोणाच्या आयु्ष्याला पडद्यावर साकारायला आवडेल. यावर जितेंद्रने क्षणाचाही विलंब न लावता पटकनं उत्तर दिलं,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बनणाऱ्या बायोपीकमध्ये मला काम करायला आवडेल. मला अरविंद केजरीवाल पडद्यावर साकारायचे आहेत. का? म्हणून प्रश्न विचारला असता तो म्हणाला,''याचं नेमकं कारण सांगता येणार नाही पण आज कुठेतरी त्यांचं व्यक्तिमत्त्व मला प्रेरित करतं म्हणून''.

'पंचायत' या सिनेमात जितेंद्रची भूमिका ही आजच्या तरुणांचं प्रतिनिधित्व करते तेव्हा याविषयी बोलताना तो म्हणाला,''मला वाटतं आता भारत चांगल्या दृष्टीनं. खूप बदलत आहे. खूप गोष्टी नव्या घडत आहेत. आपण अनेक आधुनिक गोष्टींचं अनुकरण करत आहोत. नवी कात टाकत आहोत. त्यामुळे नवा चांगला बदल तर नक्कीच होईल भारतात. माझी भूमिका या 'पंचायत २' सिरीजमध्ये हेच सांगते की,खूप अडचणी वाटेत येतील पण त्यांच्यापासून पळून दूर जाण्यापेक्षा त्यांचा हिमतीनं सामना करा. आणि मला वाटतं की आज भारतातला तरुण या गोष्टीला फॉलो करत आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com