ऑडिशन टेपमध्ये कार्तिकला 'त्या' अवस्थेत पाहून आईला बसला होता धक्का

'भूलभूलैय्या २' सिनेमातून कार्तिक आर्यन लवकरच आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनिमित्तानं अभिनेत्यानं अनेक मजेदार किस्से शेअर केले आहेत.
Kartik Aaryan
Kartik AaryanGoogle

कार्तिक आर्यन(Kaartik Aaryan) हा बॉलीवूडचा हॅंडसम हंक म्हणून ओळखला जातो. सध्या तो बॉलीवूडच्या टॅलेंटेड आणि डॅशिंग अभिनेत्यांपैकी एक आहे. आता हे बॉलीवूड सर्कलमधलं त्याचं प्रस्थ झालं पण सर्वसामान्य लोकांमध्ये देखील त्याची क्रेझ काही कमी नाही. कार्तिक आर्यनच्या चाहत्यांमध्ये आज मुलींचीच संख्या लाखोंमध्ये आहे. पण खुप कमी जणांना कदाचित हे माहित असेल की आज कार्तिकनं जे यश संपादन केलं आहे किंवा बॉलीवूडमध्ये जी स्वतःची जागा निर्माण केली आहे ते सगळं करण्यासाठी त्याला सुरुवातीला घरच्यांची नाराजगी स्विकारावी लागली होती.

Kartik Aaryan
Pushpa 2: अर्ध बजेट अल्लू अर्जुनच्या फी मध्येच गेलं, एकूण बजेट कितीचं?

कार्तिकनं यासंदर्भातले काही किस्से काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान शेअर केले होते. एक किस्सा तर त्यानं सांगितला तो खूपच मजेशीर होता. तो कार्तिकच्या एका ऑडिशन टेपचा होता. कार्तिकच्या आईनं जेव्हा ती ऑडिशन टेप पाहिली होती तेव्हा आईला धक्का बसला होता असं अभिनेत्यानं सांगितलं. त्या टेपमध्ये त्याचा एक रोमॅंटिक सीन होता. कार्तिकच्या आईवडीलांना वाटत होतं की आपला मुलगा मुंबईला शिकण्यासाठी गेला आहे,सिनेमात काम करण्यासाठी नाही. त्यामुळे ती टेप पाहून कार्तिकची आई हैराण झाली होती.

Kartik Aaryan
उर्मिलानं सोडलं कोठारे कुटुंबाचं घर? एकाच इमारतीत वेगळी रहात असल्याची चर्चा

कार्तिकनं आपल्या त्या ऑडिशन टेपविषयीचा किस्सा एका युट्युब व्हिडीओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. कार्तिकनं याच मुलाखतीत सांगितलं की त्यानं आपल्या पालकांना कधीच सांगितलं नव्हतं की त्याला अॅक्टिंग करायची आहे. का्र्तिक पुढे म्हणाला,'' खरंतर मी नवी मुंबईतील डी.व्हाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजची प्रवेश परिक्षा पास झालो होतो,म्हणून ग्वाल्हेरहून मुंबईत आलो. मी घरी मुंबईला शिकण्यासाठी चाललो आहे हेच सांगितलं होतं. पण मी मुंबईत ऑडिशन द्यायला आलो होतो. जेव्हा मी लव रंजनचा 'प्यार का पंचनामा' या सिनेमाची ऑडिशन क्लीअर केली त्यानंतर मी माझ्या पालकांना माझ्या अॅक्टिंगच्या आवडीविषयी सांगितलं''.

Kartik Aaryan
शिल्पा शेट्टीचं काय बिनसलं? सोशल मीडियावर केली मोठी घोषणा

कार्तिक पुढे म्हणाला,''ज्या दिवशी मी माझ्या आई-वडीलांना सिनेमात काम करतोय असं सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी आई आणि मावशी यांनी तडक लवरंजन चं ऑफिस गाठलं. त्यानंतर माझी ऑडिशन टेप पाहिली ज्यात रोमॅंटिक सीन होता. आणि तो सीन पाहिल्यानंतर त्या दोघी शॉक झाल्या होत्या''. त्या म्हणाल्या,''याला इथे शिकायला पाठवलं आणि हा काय करतोय''.

Kartik Aaryan
अंधश्रद्धाळू कियारा; एखादा सिनेमा साइन करेपर्यंत 'ही' गोष्ट मूळीच करत नाही

कार्तिक आता लवकरच 'भूलभूलैय्या २' सिनेमात दिसणार आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूलभूलैय्या' सिनेमाचा हा सीक्वेल आहे. 'भूलभूलैय्या' मध्ये अक्षय कुमार(Akshay Kumar),अमिषा पटेल, विद्या बालन,परेश रावल,राजपाल याजव ,शायनी अहूजा असे कलाकार होते. तर 'भूलभूलैय्या २' मध्ये कार्तिक आर्यन सोबत कियारा अडवाणी,तब्बू महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com