esakal | 'हिम्मत असेल तर अफगाणिस्तानात जा आणि...' जावेद अख्तर यांना आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

javed akhtar

'हिम्मत असेल तर अफगाणिस्तानात जा आणि...' जावेद अख्तर यांना आव्हान

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: भारतात तालिबानचे (Taliban) समर्थन करणाऱ्या मुस्लिमांवर (Muslim) टीका करताना गीतकार जावेद अख्तर (javed akthar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषदेची तालिबानसोबत तुलना केली आहे. त्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. "आरएसएस, विश्वहिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचेच आहेत हे जावेद अख्तर यांचे विधान हा समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे" अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

"जावेद अख्तर विसरतायत, हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करतायत. हिम्मत असेल तर अफगाणिस्तानात जाऊन टीका करा" असे आव्हान त्यांना भातखळकरांनी दिलं आहे. "जावेद अख्तर यांनी आपलं विधान मागे घेऊन, हिंदू सामाजाची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करु" असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

हेही वाचा: 'पडळकर नवीन उगवलेलं गवत, त्यांना अजून मूळ सापडलं नाही'

भारतात तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांची संख्या फार कमी असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. उजवी विचारसरणी सुद्धा दडपशाही करणारी असल्याचे त्यांचे मत आहे. तालिबान आणि ज्यांना तालिबान सारखे बनायचेय, त्यांच्यात भीतीदायक साम्य असल्याचे जावेद अख्तर यांनी सांगितलं.

हेही वाचा: 'शिवसेनेसारख्या विश्वास घातक्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही'

"भारतातील मुस्लिमांच्या फार छोट्या वर्गाने अफगाणिस्तानात तालिबानचं समर्थन केलं आहे. मी ज्या मुस्लिमांशी बोललो, त्यातले अनेकजण काहींनी अशी विधाने केल्यामुळे हैराण होते. भारतातील तरुण मुस्लिमांना चांगला रोजगार, चांगलं शिक्षण आणि मुलांसाठी चांगली शाळा हवी आहे" असे जावेद अख्तर म्हणाले.

loading image
go to top