Manoj Tiwari Daughter : लक्ष्मीनंतर घरात सरस्वतीचे आगमन, वयाच्या ५१व्या वर्षी भाजप खासदार बनला तिसऱ्यांदा बाप

bjp mp actor manoj tiwari became blessed with baby girl shared photo with wife
bjp mp actor manoj tiwari became blessed with baby girl shared photo with wife

भाजप खासदार मनोज तिवारी हे तीसऱ्यांदा बाप बनले आहेत. आज त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. मनोज तिवारी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. यानंतर त्यांनी पत्नी सुरभि यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. त्यानंतर सोशल मिडीयावर मनोज तिवारी यांचे फॅन्स आणि सेलेब्रिटींनी त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत.

मनोज तिवारी म्हणाले, "माझ्या घरी लक्ष्मीनंतर सरस्वतीचे आगमन झाले आहे, हे कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे. आज घरात एका सुंदर मुलीचा जन्म झाला. तिच्यावर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असू द्या... " - सुरभि -मनोज तिवारी.

काही दिवसांपूर्वी, 51 वर्षीय राजकारणी मनोज तिवारी यांनी त्यांची पत्नी सुरभी तिवारीच्या 'बेबी शॉवर'चा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता आणि ते लवकरच दुसऱ्या मुलाचा बाप होणार असल्याची माहिती दिली होती. मनोज तिवारी आणि सुरभी तिवारी यांचे हे दुसरे अपत्य आहे. मनोज तिवारी यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगीही आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

bjp mp actor manoj tiwari became blessed with baby girl shared photo with wife
Chandrakant Patil : 'भीक' शब्दाने भाजपमध्येच मतभेद! केंद्रीय मंत्र्याने चंद्रकांत पाटलांना सुनावलं

सुरभी ही मनोज तिवारी यांची दुसरी पत्नी असून त्यांच्या घरी 2020 मध्ये पहिल्या मुलीचा जन्म झाला. यापूर्वी मनोज तिवारी यांनी 1999 मध्ये राणी तिवारीशी लग्न केले होते आणि दोघांना रिती नावाची मुलगी आहे. 2012 मध्ये, मनोज आणि राणी तिवारी यांनी लग्नाच्या 11 वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

bjp mp actor manoj tiwari became blessed with baby girl shared photo with wife
शाईफेक लोकशाही विरोधीच, तरी आरोपींची केस मोफत लढवणार, कारण…; असीम सरोदेंनी मांडली भूमिका

सोशल मीडियावर ट्रोल झाले होते

मनोज तिवारीने इंस्टाग्रामवर 'बेबी शॉवर'चा व्हिडिओ शेअर करताच सेलिब्रिटी आणि त्याच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, वयाच्या 51 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाप झाल्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोलही करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com