Carrie Bernans: ब्लॅक पँथर फेम अभिनेत्रीचा गंभीर अपघात! दात अन् हाडांचा अक्षरशः चुरा! भयानक फोटो व्हायरल

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कॅरीचा अपघात झाला.
Marvel actress Carrie Bernans injured in NYC crash
Marvel actress Carrie Bernans injured in NYC crash
Updated on

Marvel actress Carrie Bernans: मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आहे. 'मार्वल' फेम अभिनेत्री अपघाताची बळी ठरली आहे.

हा अपघात इतका भीषण झाला की यात तिचे दात आणि हाडे तुटली आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत जे पाहिल्यानंतर नेटकरी थक्क झाले आहेत. ती अभिनेत्री आहे 'ब्लॅक पँथर' फेम कॅरी बर्नन्स.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कॅरीचा अपघात झाला. कॅरीच्या आईने तिच्या सोशल मीडिया काही फोटो शेअर करत या अपघाताची माहिती दिली आहेत. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा दिसत आहेत तर तिचे दातही तुटलेले आहेत. सोमवारी नववर्षाच्या सुरुवातीलाच कॅरी हिट अँड रनची बळी ठरली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली.

Marvel actress Carrie Bernans injured in NYC crash
Ira Khan Wedding: लेकीच्या लग्नात आमिरने केला 'या' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

कॅरी सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. कॅरी काही दिवसांपुर्वीच आई झाली आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे हा अपघात झाला तेव्हा ती बाळासोबत नव्हती.

कॅरीच्या आईने हे फोटो शेयर करत लिहिले, 'ती अजूनही खूप वेदनेत आहे. कुणालाही प्रतिसाद देऊ शकत नाही. मात्र तुम्ही केलेल्या संदेशांसाठी आणि प्रेमासाठी आभारी आहे. ही एक वेदनादायक घटना होती. तिला वेदना होत आहेत, पण ती बरी होत आहे. कॅरीवर प्रेम आणि प्रार्थनाचा वर्षाव करत रहा.

Marvel actress Carrie Bernans injured in NYC crash
Deepika Padukone: लवकरच आई होणार? दीपिकाने अखेर खुलासा केलाच, म्हणाली, "रणवीर आणि मला मुलं.."

कॅरीच्या आईने या घटनेची माहिती देताना सांगतिले की न्यूयॉर्कमध्ये तिचा अपघात झाला. सुमारे 40 वर्षांच्या एका व्यक्तीने तिला धडक दिली. त्याने हिट अँड रन पासून वाचण्यासाठी बऱ्याच कारला धडक दिली. या अपघातात तिची अनेक हाडे मोडली आणि दात तुटले आहे. मात्र आम्ही देवाचे आभार मानतो की ती जिवंत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅरी बर्नन्सला मॅनहॅटनमधील एका रेस्टॉरंटच्या आउटडोअर डायनिंग एरियामध्ये ड्रायव्हरने कारने धडक दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

image-fallback
Underwater Marvel: INS Guldar Becomes India’s First Underwater Museum
Engineering Marvel: 350-Ton TBM Cutterhead Lowered into Vikhroli Shaft
Gondia News
Marathi News Esakal
www.esakal.com