'Black Panther: Wakanda Forever' च्या नवीन ट्रेलर अन् पोस्टरनं वाढवली उत्सुकता

नवीन ब्लॅक पँथर सोबत, ट्रेलरमध्ये एका नवीन खलनायकाची धमाकेदार एंट्री देखील दाखवली आहे
Black Panther: Wakanda Forever New Trailer Out
Black Panther: Wakanda Forever New Trailer OutGoogle
Updated on

Black Panther: Wakanda Forever :ब्लॅक पँथरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. या वर्षी सलग दोन चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स २०२२ मध्ये तिसरा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. 'ब्लॅक पँथर २ ' ची रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशीतशी लोकांची उत्सुकता वाढत आहे.मार्वलने 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर'चा नवीन ट्रेलर आणि पोस्टर लाँच केला आहे, ज्याने सर्वांच्या डोळ्यात सिनेमाविषयीच्या उत्सुकतेसोबतच,चेहऱ्यावर भारावून गेल्याचे भावही दिसून येत आहेत. नवा ब्लॅक पँथर आपल्याला जुन्या ब्लॅक पँथरची आठवण करून देत आहे.(Black Panther: Wakanda Forever New Trailer Out)

Black Panther: Wakanda Forever New Trailer Out
Big Boss16: साजिद खान आणि शालिन भानोतमध्ये जुंपलं भांडण,कारण ऐकाल तर हसू आवरणार नाही

रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये मार्वलने चाहत्यांना नवीन ब्लॅक पँथरची ओळख करून दिली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अजुन वाढली आहे. नवीन ब्लॅक पँथर सोबत, ट्रेलरमध्ये एका नवीन खलनायकाची धमाकेदार एंट्री देखील दाखवली आहे, ज्याचा धोका वाकांडावर आहे. अशा परिस्थितीत आणखी एक ब्लॅक पँथर आपला देश वाचवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Black Panther: Wakanda Forever New Trailer Out
Big Boss Marathi 4: 'सांगकाम्या आहेस तू...',म्हणत तेजस्विनीनं प्रसादचा केला पाणउतारा

या ट्रेलरमध्ये दमदार कथा आणि व्हिज्युअलसोबतच भरपूर अॅक्शनही पाहायला मिळत आहे. अभिनेता नामोर चित्रपटात खलनायकाची भूमिका करत आहे. ब्लॅक पँथरची बहीण शुरी म्हणजेच अभिनेत्री लेटिशिया राईट दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Black Panther: Wakanda Forever New Trailer Out
Big Boss 16: 'हा तर गरिबांचा हृतिक..',गौतमला सुनावताना रॅपरच्या भडकलेल्या चाहत्यांची घसरली जीभ

नवा खलनायक, नवा ब्लॅक पँथर यासोबतच हा ट्रेलर दिवंगत अभिनेता चॅडविक बोसमन यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आहे. जुन्या ब्लॅक पँथरला चित्रपटात अशा स्वरुपात पाहून सर्वांचे डोळे ओलावतील हे तर नक्की आहे. ट्रेलरमध्ये वाकांडाच्या राजकारणाची आणि रणनीतीचीही झलक पाहायला मिळणार आहे. रायन कूगलर दिग्दर्शित 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' ११ नोव्हेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com