
आमिरच्या लाडक्या लेकीला इराला जडला आणखी एक गंभीर आजार
Bollywood News: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या हटकेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. त्याच्या वेगळेपणामुळे तो नेहमीच चर्चेत (Bollywood Actor) असतो. येत्या वर्षी त्याचा लाल चढ्ढा सिंग (Lal Chadha Singh) नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आमीरनं जोरदार प्रमोशन सुरु केलं आहे. त्यादरम्यान त्याच्या कुटूंबातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याची मुलगी आता (Bollywood celebrity) डिप्रेशननंतर आणखी एका वेगळ्या आजारानं ग्रासली आहे. तिनं याबाबत पोस्ट शेयर करुन याविषयी माहितीही दिली आहे. इरा यापूर्वी डिप्रेशनमध्ये गेल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे आमीरलाही मोठी चिंता होती. त्यात पुन्हा एका वेगळ्या आजाराची भर पडल्यानं त्याची डोकेदुखी वाढली आहे.
इरानं शेयर केलेल्या एका पोस्टमध्ये अंग्झायटी अॅटॅक्सचा उल्लेख केला आहे. यामुळे आमिरचे चाहते धास्तावले आहेत. इरानं इंस्टावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिनं सविस्तर लिहिलं आहे. त्यात ती म्हणते, गेल्या काही दिवसांपासून माझ्या अडचणीत वाढ झाली आहे. मी एका वेगळ्या परिस्थितीला सामोरं जातं आहे. यापूर्वी डिप्रेशनचा सामना मला करावा लागला होता. त्याला धैर्यानं तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे उपचारही घेतले. मला आता आणखी अस्वस्थ वाटू लागले आहे. त्याचे कारण मला अँग्झायटीचा अॅटक येऊ लागला आहे. त्यामुळे माझी भीती आणखी वाढली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे आता माझ्या हदयाची धडधड वाढू लागली आहे. श्वास कमी जास्त होतो आहे. त्यावेळी मला काय करावे कळत नाही. मी एका वेगळ्या त्रासाला सामोरं जात आहे. मी आता माझ्यातील भीती कमी करण्याचा प्रयत्नही करते आहे. मी जेव्ही नुपूरशी बोलते तेव्हा मला बरे वाटते. काही काळ मी आनंदात असते. त्याच्याशी बोलण्याचा आनंद वेगळा आहे. इरानं त्या पोस्टच्या शेवटी लिहिलं आहे की, मला एका गोष्टीची आणखी एक चिंता आहे ती म्हणजे याशिवाय मला आणखी काही होणार तर नाही ना, गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीची चिंता सतावते आहे.