esakal | बॉलिवूडमध्ये 1000 कोटींची डील, टी-सीरिज-अनिल अंबानी आले एकत्र
sakal

बोलून बातमी शोधा

cinema hall

बॉलिवूडमध्ये 1000 कोटींची डील, टी-सीरिज-अनिल अंबानी आले एकत्र

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोनामुळे (corona virus) अन्य क्षेत्रांप्रमाणे भारतात चित्रपट उद्योगाचही (film industry) मोठं नुकसान झालं आहे. मागच्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर लॉकडाउन (lock down) घोषित करण्यात आला. तेव्हापासून देशभरातील थिएटर्स बंदच आहेत. आता काही राज्यांमध्ये थिएटर्स (Cinema hall) उघडण्यात आली असली, तरी मुंबईत मात्र अजूनही थिएटर्स उघडण्याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मागच्या दीडवर्षापासून मोठ्या बॅनरचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही.

निर्मात्यांनी सध्याच्या परिस्थितीत OTT प्लॅटफॉर्मकडे मोर्चा वळवला आहे. भारतात हिंदी चित्रपट उद्योग काही हजार कोटींच्या घरात आहेत. थिएटर्समध्ये काम करणाऱ्यांपासून ते चित्रपट निर्मितीत गुंतलेल्या हजारो लोकांचे रोजगार त्यावर अवलंबून आहेत. कोरोनामुळे कोलमडून गेलेल्या या चित्रपट उद्योगाला आता भारतातले दोन मोठे फिल्म स्टुडिओज आधार देणार आहेत. मिंट ने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: मुंबई: कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश, मुलीचा मृत्यू

टी-सीरिज आणि अनिल अंबानींची रिलायन्स एंटरटेनमेंट लिमिटेड एकत्र येऊन दहापेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती करणार आहे. यामध्ये अ‍ॅक्शन थ्रिलरपासून ऐतिहासिक, बायोपिक आणि विनोदी चित्रपट असणार आहेत. पुढच्या ३६ महिन्यात म्हणजेच तीन वर्षात हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही प्रोडक्शन हाऊसच्या प्रमुखांनी मुलाखतीत ही माहिती दिली. पुढच्यावर्षीच्या सुरुवातीला काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

हेही वाचा: नाराजीबद्दल गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन, म्हणाले....

१० अब्ज रुपये १३ कोटीपेक्षा जास्त डॉलर्सची गुंतवणूक या मध्ये असेल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं आणि बॉलिवूडचं वेगळं नातं आहे. बॉलिवुडच्या कुठल्याही निर्मात्याचं मुंबईत चित्रपट प्रदर्शित करण्याला पहिलं प्राधान्य असतं. कारण मुंबईतून मिळणाऱ्या उत्पन्नावर नफ्याची गणितं बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतात. त्यामुळे मुंबई कुठल्याही निर्मात्यासाठी महत्त्वाची आहे. पण कोरोनामुळे मागच्या दीडवर्षापासून इथे थिएटर्स, मल्टिप्लेक्स बंद आहेत. ज्याचा मनोरंजन उद्योगाला मोठा फटका बसत आहे.

loading image
go to top