Akshay Kumar - Narendra Modi: मोदी भारतातील प्रभावशाली व्यक्ती.. अक्षय कुमार असं का म्हणाला ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar, pm narendra modi, narendra modi, selfiee movie

Akshay Kumar - Narendra Modi: मोदी भारतातील प्रभावशाली व्यक्ती.. अक्षय कुमार असं का म्हणाला ?

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. नरेंद्र मोदींनी मांडलेल्या एका मुद्द्यावरून अक्षयने मोदींचं तोंडभरून कौतुक केलंय. अक्षय कुमारच्या 'सेल्फी' सिनेमाचा ट्रेलर लाँच नुकताच झाला. या ट्रेलर लाँचच्या वेळी अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: Anurag Kashyap - Vivek Agnihotri: अनुराग कश्यपच्या मोदींवरील टिकेवर विवेक अग्नीहोत्री भडकले, म्हणाले..

झालं असं कि... पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावरून चांगलाच वाद रंगला. बेशरम रंग मध्ये दीपिका पादुकोणने भगवी बिकिनी परिधान करून डान्स केला. त्यावरून मोठा वाद रंगला. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अनावश्यक टिपणी करू नये म्हणून सूचना केल्या. "कोणीही अनावश्यक टिप्पण्या करू नये ज्यामुळे आम्ही करत असलेले कठोर परिश्रम वाया जाईल", अशा शब्दात मोदींनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

हेही वाचा: Veer Murarbaji: हा अभिनेता साकारणार रणझूंजार मुरारबाजींची भूमिका, पहिली झलक आली समोर

मोदींच्या याच भूमिकेवर अक्षयने भावना व्यक्त केल्या आहेत. सेल्फीच्या ट्रेलर लाँचवेळी अक्षय म्हणाला,"आता अधिक स्वतंत्र असल्याने एंटरटेनमेंट इंडस्ट्री मोकळा श्वास घेऊ शकते. सकारात्मकतेचे नेहमीच स्वागत असते. याशिवाय जेव्हा आमचे पंतप्रधान काहीतरी बोलत असतात, तेव्हा मला वाटते की ते भारतातील सर्वात मोठे प्रभावशाली व्यक्ती आहेत. पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांमुळे परिस्थिती बदलली तर ते मनोरंजन क्षेत्रासाठी खूप छान होईल. का नाही? हे बदलले पाहिजे. गोष्टी बदलल्या पाहिजेत कारण आपल्याला खूप त्रास होतो."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनांमुळे बॉयकॉट ट्रेंड सुद्धा बंद होईल असा अक्षय कुमारला विश्वास वाटतो. ब्रम्हास्त्र, लाल सिंग चड्ढा, सम्राट पृथ्वीराज अशा सिनेमांना बॉयकॉटचा फटका बसून सिनेमे फ्लॉप ठरले. शाहरुख खानच्या आगामी पठाण विरोधात सुद्धा काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. त्यामुळे मोदींच्या व्यक्तव्यामुळे सिनेमांना होणार विरोध काही प्रमाणात कमी होईल, असं अक्षय कुमार म्हणाला. अक्षय कुमारचा आगामी सेल्फी सिनेमा २४ फेब्रुवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.