esakal | क्रितीच्या हॉट फोटोवर 'बिग बी'ची कमेंट; चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actor amitabh bachchan gets troll for commenting on kriti sanon bold photo.jpg

 क्रितीच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. पण एका कमेंटकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

क्रितीच्या हॉट फोटोवर 'बिग बी'ची कमेंट; चर्चांना उधाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द अभिनेत्री क्रिती सेनॉनने नुकताच सोशल मिडीयावर हॉट फोटो शूटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. प्रसिध्द फोटोग्राफर तेजस नेरूळकर याने क्रितीचे हे फोटोशूट केले आहे.  क्रितीच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. पण एका कमेंटकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

रामायण आणि महाभारताची वर्षपूर्ती; लॉकडाऊनमध्ये केला विक्रम

बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी क्रितीच्या या फोटोलो 'WOW'अशी कमेंट केली. त्यावरून आता बिग बी यांना ट्रोल केल जाताय. 'दीदी तेरा दादू दीवाना' असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. ‘दीदी दादू की भावनाओं में सम्मान है आपके लिए. Wow…’, ‘बच्चन सर मजा करत आहेत’, 'बच्चन सहाब मौज में.. जया और रेखा क्रिती सेनॉन के खोज में, अशा हटके कमेंट करत सोशल मिडीयावर अमिताभ बच्चन यांना ट्रोल केले जात आहे. काहींनी बिग बींने केलेल्या कमेंटचे कौतुक केले. ‘मला कळत नाही त्यांनी केलेल्या कमेंटमध्ये चुकीचे काय आहे’ असे एका बिग बींच्या चाहत्याने म्हटले आहे. जया बच्चन आणि क्रितीचे मिम्स सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

वामिकाचा आजोबांसोबत पहिला फोटो; अनुष्काने शेअर केली 'खास' पोस्ट 

लवकरच क्रिती दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. दाक्षिणात्य सुपस्टार प्रभास सैफ, अली खान आणि क्रिती अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटाची असणार आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे प्रभू श्री रामांच्या आयुष्यावर आधारित कथानक आहे . चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे तर सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. तसेच हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा असणार आहे. भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 2020 मध्ये हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.