esakal | रामायण आणि महाभारताची वर्षपूर्ती; लॉकडाऊनमध्ये केला विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

television ramayan and mahabharat re telecast in lockdown complets one year break records.jpg

तरूण पिढीला आपल्या भारताचा इतिहास तसेच पौराणिक कथा टिव्हीवर पहायला मिळाल्या. त्याकाळची मालिका चित्रीकरणाची पध्दत तसेच कलाकारांचे अभिनय पाहून तरूण पिढीला आश्चर्य वाटले.

रामायण आणि महाभारताची वर्षपूर्ती; लॉकडाऊनमध्ये केला विक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जगात कोरोना महामारीचा उद्रेक सुरू आहे. 24 मार्च 2020 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. वाहतूक, बाजार पेठा, चित्रपटगृह सर्व काही बंद करण्यात आले. लॉकडाउनमध्ये लोक सर्व वेळ आपल्या कुटुंबासोबत राहायला लागले.

जनतेच्या मनोरंजनासाठी प्रसारण मंत्रालयाने 80 आणि 90 दशकातील रामायण आणि महाभारत या मलिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनच्या काळात पूर्ण कुटुंब या मालिका एकत्र बसून पाहू लागले. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 90 च्या दशकातील पिढीला या मालिकेच्या पुनर्प्रसारणामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तरूण पिढीला आपल्या भारताचा इतिहास तसेच पौराणिक कथा टिव्हीवर पहायला मिळाल्या. त्याकाळची मालिका चित्रीकरणाची पध्दत तसेच कलाकारांचे अभिनय पाहून तरूण पिढीला आश्चर्य वाटले.

वामिकाचा आजोबांसोबत पहिला फोटो; अनुष्काने शेअर केली 'खास' पोस्ट 

पूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला तेव्हा सोशल मिडीयावर लोकांनी पौराणिक कार्यक्रमांना पुन्हा एकदा प्रसारित करण्याची मागणी केली. त्यानंतर दुरदर्शनवर रामायणाचा पहिला एपिसोड 28 मार्चला सकाळी 9 वाजता आणि दुसरा एपिसोड रात्री 9 वाजता प्रसारित झाला. प्रसिध्द पौराणिक मालिका महाभारतचा लॉकडाउनमध्ये पहिला एपिसोड 28 मार्चला डीडी भारतीवर दुपारी 12 वाजता प्रदर्शित झाला. 

'फिल्मफेअर-2021' पुरस्कार झाले घोषित; पाहा कोण ठरलेत  मानकारी 

लॉकडाउनमध्ये प्रसारित झालेल्या रामायण मालिकेच्या टीआरपीने रेकोर्ड तोडले आहे. रामायण हिंदी मनोरंजन क्षेत्रामधील सर्वात जास्त टीआरपी मिळवणारी मालिका ठरली आहे. रामायण मालिकेने लॉकडाऊनमध्ये 42.6 मिलीयन ट्यून-इन्स मिळवले आहेत.

loading image