'ये दीवार तुटती क्यो नही?': अमिताभचा बंगला लोकाआयुक्तांच्या रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh bachchan
'ये दीवार तुटती क्यो नही?': अमिताभचा बंगला लोकाआयुक्तांच्या रडारवर

'ये दीवार तुटती क्यो नही?': अमिताभचा बंगला लोकाआयुक्तांच्या रडारवर

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन (bollywood actor amitabh bachchan) हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहे. त्यांना अनेकदा त्यांच्या वादग्रस्त कारणांसाठी नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा (entertainment) सामना करावा लागला आहे. आताही ते चर्चेत आले आहे त्याचे कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेनं (BMC) त्यांच्याबाबत घेतलेलं नरमाईचं धोरण. यासगळ्या प्रकरणावर लोकायुक्तांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्याबाबत नेमक्या कोणत्या कारणासाठी कारवाई करण्यात येत आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

त्याचं आहे असं की, अमिताभ (Amitabh Bachchan) यांचा जुहूमध्ये प्रतीक्षा नावाचा बंगला आहे. त्यापरिसरामध्ये पालिकेच्यावतीनं रस्त्याचं काम सुरु असून त्याचे रुंदीकरण होणार आहे. मात्र यावेळी अमिताभ यांच्या बंगल्यामुळे त्या रुंदीकरणास अडचण येत असल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे त्यांच्या बंगल्याची भिंत पाडण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र त्याची कारवाई झालेली नाही. याप्रकरणी लोकायुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ का केली याची विचारणाही त्यांनी केली आहे. याप्रकरणात आपल्याला पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून विनाकारण टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या रस्त्याच्या रुंदीकरणास विलंब होत असल्याचे राज्याच्या लोकायुक्तांनी सांगितलं आहे

हेही वाचा: कोण होती गंगुबाई ? Gangubai Kathiawadi | Alia Bhatt |Bollywood Movie

पालिकेच्यावतीनं अमिताभ यांच्या बंगल्याची भिंत पाडण्यासंबंधी दिरंगाई होताना दिसत आहे. त्यासंबंधी जी कारणं दिली आहेत ती पटण्यासारखी नसल्याचेही सांगण्यात आले आहे. अशावेळी तातडीनं त्याप्रकरणी कारवाई व्हावी असे आदेश आता देण्यात आले आहे. राज्याचे लोकायुक्त व्ही एम कानडे यांनी नगर विकास अभियंत्यांच्या विरोधात नोटीस जाहीर करण्यासंबंधी भाष्य केलं आहे. असं त्यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटलं आहे. बीएमसीचं त्यावर असं म्हणणं आहे की, आम्ही अमिताभ यांच्या बंगल्याच्या भिंतीबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. याचे कारण आम्हाला त्याठिकाणी काम करण्यासाठी कोणताही ठेकेदार मिळालेला नाही.

हेही वाचा: कंगणाने केली पुन्हा टिवटिव; '' India Reject Bollywood'' हॅशटॅग मधून निषेध

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top