रिचाने केवळ एक सवाल केला आणि करावा लागला ट्रोलिंगचा सामना...

richa'
richa'

मुंबई : अभिनेत्री रिचा चड्ढा बर्‍याच दिवसांपासून आपल्या लग्नामुळे चर्चेत राहिली आहे. अभिनेता अली फजल आणि रिचा बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या  दोघांनी यावर्षी एप्रिल महिन्यात लग्न करणार होते. पण अचानक कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने रिचा आणि अली यांना आपलं लग्न पुढे ढकलाव लागलं. आता हे दोघेही वर्षाच्या अखेरीस लग्न करणार असल्याची चर्चा आहे. अशातच रिचाला तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगवरून आणि  ती देशविरोधी असल्याने ट्रोल करण्यात आलं होतं. आता यावर तिने स्पष्टीकरण दिले आहे आणि ट्रोलर्सनी तिला का टॅग केले हेही तिने सांगितले आहे. 

एका मुलाखतीत आपल्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल बोलताना रिचा म्हणाली की,'हे लग्न लखनऊ-मुंबई आणि दिल्लीमधील एक सामान्य लग्न असू शकते.' लॉकडाऊनमुळे रिचा मुंबईमध्ये आहे तर अली दिल्लीमध्ये अडकला आहे. मुंबईमध्ये राहून रिचा अलीला खूप मिस करत आहे. रिचाने सांगितले की मी फक्त लॉकडाऊन कधी संपणार एवढंच विचारलं होतं आणि याच प्रश्नावरून ट्रोलर्सनी ट्विटरवर मला देशविरोधी म्हणण्यास सुरुवात केली. रिचा आणि अली स्वतःच लग्नाची तयारी करत होते. 

रिचा म्हणाली, 'अली आणि मी आम्ही दोघही स्वतः लग्नाच्या सगळ्या गोष्टी आयोजित करत होतो. सर्वांना आमंत्रण देणं बाकी होतं. इतर सर्व गोष्टींची आम्ही तयारी केली होती पण लॉकडाऊनमुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत.' अली आणि रिचा नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. या दोघांनी 'फुकरे' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि या चित्रपटापासून त्याच्या नात्याला सुरवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com