कश्मिरी पंडित सरपंचाच्या हत्येबद्दल मौन का? - अनुपम खेर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

या दुर्देवी घटनेबद्दल अनुपम खेर यांनी शोक व्यक्त केला आहे.

बॉलिवुड अभिनेता अनुपम खेर हे सोशल मिडीयावर चांगलेच अॅक्टीव आसतात, तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामजिक प्रश्नांवर मुक्त पणे व्यक्त होताना दिसतात. स्वतः कश्मिरी पंडित असल्याने मागच्या अनेक वर्षांपासून कश्मिरी पंडितांच्या समस्या सर्वांसमोर मांडण्याचे काम ते करत आले आहेत. नुकतेच जम्मू-कश्मीर येथील अंनतनाग जिल्ह्यात कश्मिरी पंडित असणाऱ्या सरपंचाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती, या घटनेबद्दल त्यांनी सोशल मिडीयावर संताप व्यक्त केला आहे.

चोक्डमधील अभिनेत्री क्रिकेटवेडी, पाहा EXCLUSIVE मुलाखत

अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत सतत मोठ्याने आवाज करणारे बुध्दीजीवी लोक या घटनेवर मौन का आहेत असा सवाल उपस्थीत केला आहे. अनंतनागमध्ये झालेल्या काश्मिरी पंडित सरपंचाच्या हत्येने मी फार दु:खी आहे. या घटनेचा मला संतापही येतोय. कश्मिरी पंडित असलेला एकमेव सरपंच अजय पंडित याला गोळी मारण्यात आली, मी त्यांना श्रध्दांजली देतो. जे लोक नेहमी छाती बडवत रडत राहतात ते य़ा घटनेवर शांत का दिसत आहेत, एकही जण यावर काही बोलत नाहीये.” असे कॅपशन खेर यांनी त्यांच्या व्हिडीओला दिले आहे. 

 

डीपी के सुझाव: दीपिकाने चाहत्यांसाठी शेअर केले स्वतःचे क्रिएटिव्ह सिक्रेट्स....

काल भर दिवसा दहशतवाद्यांनी भर रस्त्यात गोळी मारुन एकट्या कश्मिरी पंडित असलेल्या सरपंचाची हत्या केली. तो एकटा होता कारण कश्मीरमध्ये दुसरा एकही कश्मिरी पंडित सरपंच झाला नाही. 19 जानेवारी 1980 साली जे झाले त्याची पुनरावृत्ती करण्यात येत आहे, मागच्या कित्येक वर्षांपासून कश्मिरी पंडीतांवर आत्याचार करण्यात येत आहेत, आणि त्याचा समोर येत कोणीही विरोध करताना दिसत नाही, असा आरोप अनुपम खेर यांनी या व्हिडीओद्वारे केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood actor anupam kher gets angry and condemns kashmiri pandit murder in anantnag district