'आईनं दिलेली रुद्राक्ष माळ मोदींचं करेल रक्षण', प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट|Bollywood Actor Anupam Kher | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

'आईनं दिलेली रुद्राक्ष माळ मोदींचं करेल रक्षण', प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट

Bollywood News: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नेहमीच बॉलीवूडमधील सेलिब्रेटींच्या चर्चेत राहिले आहेत. काही सेलिब्रेटी तर कायम त्यांचे कौतूक करताना दिसतात. त्यामध्ये काही नावांचा उल्लेख करायचा झाल्यास अक्षय कुमार, कंगना रनौत यांच्याविषयी सांगता येईल. आता प्रसिद्ध अभिनेते अनुमप खेर हे (Anupam Kher)त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाईल्समुळे खेर यांच्या अभिनयाची प्रेक्षकांनी प्रशंसा केली होती. बॉक्स ऑफिसवर काश्मीर फाईल्सनं (The Kashmir Files) विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले होते. त्यावेळी खेर यांनी सोशल मीडियावरुन काश्मीर फाईल्सचे प्रमोशन करताना प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. आता खेर यांनी मोदीजींसमवेत (entertainment news) एक फोटो शेयर केला आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे.

खेर यांनी मोदीसमवेत फोटो पोस्ट करताना त्याला मोठी कॅप्शनही दिली आहे. त्यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटसही दिल्या आहेत. यापूर्वी खेर यांच्या पोस्टमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. काश्मीर फाईल्सचं वेगळ्या प्रकारे प्रमोशन केल्यानं देखील त्यांच्यावर टीका झाली होती. आता खेर यांनी मोदी यांना खास गिफ्ट दिलं आहे. त्याविषयी त्यानं लिहिलं आहे की, माझ्या आईनं खास मोदींसाठी रुद्राक्षाची माळ तयार केली आहे. आणि ती माळ मोदींचे कायम संरक्षण करेल असे सांगण्यात आले आहे. मोदींजींची कौतुक करताना खेर म्हणतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, मोदीजी दिवसरात्र देशाला आणखी सक्षम करण्यासाठी ते प्रचंड कष्ट करत आहे. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. अशावेळी त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल.

हेही वाचा: Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत

माझ्या आईनं त्यांच्यासाठी खास रुद्राक्षाची माळ तयार केली आहे. जी त्यांचे कायम रक्षण करेल. हे सगळं त्यांच्या प्रेमापोटी आहे. खेर यांनी आपल्या एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की, देव मोदींचे कायम रक्षण करेल. त्यांचे कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देईल. यात शंका नाही. यावेळी खेर यांनी तिरंग्याचा इमोजीही शेयर केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अनुपम खेर यांचा द काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. त्यावरुन काही ठिकाणी वादही झाला होता.

हेही वाचा: Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!

Web Title: Bollywood Actor Anupam Kher Special Gift For Pm Narendra Modi Post Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top