esakal | कोरोनाला हरवण्यासाठी 'फरहान' मैदानात

बोलून बातमी शोधा

bollywood actor farhan akhtar
कोरोनाला हरवण्यासाठी 'फरहान' मैदानात
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशावेळी कोरोनाला सामोरं जाण्यासाठी आणि त्याच्यापासून सुटका करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. बॉलीवूडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला होता. अनेक कलावंतांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सेलिब्रेटींनी आपल्या चाहत्यांना कोरोनापासून सावध होण्याचे चाहत्यांना आवाहन केले आहे. कोरोनाच्या बंदोबस्तासाठी सरकारला मदतीचा हात म्हणून अनेक सेलिब्रेटी पुढे आले आहेत.

बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यानं सोशल मीडियावर कोरोनाग्रस्तांना आपण मदत करत आहोत. अशी पोस्ट शेअर केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता साडेचार लाखांच्यापुढे गेलीय. त्याची एक्सेल एंटरटेनमेंटच्या वतीनं कोरोनाग्रस्तांना मदत केली जाणार आहे. त्याची ही कंपनी काही एनजीओ बरोबर काम करणार आहे. आता फरहाननं काही एनजीओची यादी जाहीर केली आहे. त्या एनजीओ ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणार आहे. तसेच गरजुंना जेवणही पुरवणार आहे.

फरहाननं आपल्या व्टिटमध्ये असं म्हटलयं की, कोविडचा सामना करण्यासाठी मी काही एनजीओची यादी तयार केली आहे. ती सोशल मीडियावर शेअरही केली आहे. जेणेकरुन लोकांनी त्या मदतीचा लाभ मिळेल. सध्या कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अशावेळी नागरिकांनी स्वयंशिस्त दाखवणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी एकजुटपणे कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न केल्यास ते सहज साध्य होईल. असा विश्वासही फरहाननं व्यक्त केलायं.

फरहान एक दिग्दर्शक म्हणून बराच काळ बॉलावूडमध्ये कार्यरत आहे. त्याचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र त्याला कोरोनाचा फटका बसला आहे. कोविडमुळे अनेक प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे शक्य नाही. आता त्याचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.