'डोकं घरी ठेवून आलात की काय?': जॉन पत्रकारावर चिडला

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हा त्याच्या हटके अभिनयासाठी ओळखला जातो.
John Abraham
John Abraham esakal

Bollywood News: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हा त्याच्या हटके अभिनयासाठी ओळखला जातो. दोन दिवसांनी त्याचा अटॅक (Attack Movie) नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉ़न सध्या त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या या नव्या चित्रपटाची (Bollywood Movies) चर्चा होती. त्यानं या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी एका पत्रकारानं त्याला (Entertainment News) विचारलेल्या प्रश्नामुळे जॉनच्या रागाचा पारा चढला. त्यानं त्या पत्रकाराला चांगलेच सुनावले आहे. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल (social media news) झाली आहे. पत्रकाराचा प्रश्न जॉनच्या वर्मी लागल्यानं त्याला राग अनावर झाल्याचे दिसून आले आहे.

हल्ली सेलिब्रेटींच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे पत्रकार काही सनसनाटी बातमी मिळावी म्हणून संबंधित सेलिब्रेटीला विषय सोडून वेगळाच प्रश्न विचारतात. त्यामुळे अनेकदा त्या गोष्टीचा राग आल्यानं सेलिब्रेटींनी राग व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. असाच काहीसा प्रकार जॉनच्या बाबत घडला आहे. अटॅकची पत्रकार परिषद सुरु होती. त्यावेळी त्या पत्रकारानं जॉनला त्याच्या चित्रपटातील अनरियलिस्टिक अॅक्शन सिक्वेन्सविषयी विचारलं होतं. तो प्रश्न काही जॉनला आवडला नव्हता.

John Abraham
RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

त्यावेळी जॉनबरोबर अभिनेत्री रकुल प्रीत सुद्धा होती. जॉन अब्राहमच्या नव्या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठया प्रमाणात उत्सुकता आहे. एक एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तुझ्या चित्रपटांमध्ये अॅक्शन सीन्सचा ओव्हरडोस असतो असा प्रश्न त्या पत्रकारानं विचारला होता. तुम्ही जेव्हा चार ते पाच लोकांसोबत लढत असता तेव्हा ठीक असतं. मात्र दोनशे लोकांसोबत लढता तेव्हा मात्र ते अतिरंजितपणा वाटतो. असंही त्या पत्रकारानं विचारल्यानं जॉनच्या रागाचा पारा चढला. आणि त्यानं त्या पत्रकाराला चांगलंच खडसावलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com