esakal | कुंभमेळ्यावर बोलला, चूकीला माफी नाही; अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

 bollywood actor karan wahi receives death threats

कुंभमेळ्यावर बोलला,अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

सोशल मीडियावर करणनं लिहिलं आहे की, नागा बाबांसाठी वर्क फ्रॉम होमचा कल्चर नाही का? त्यांनी गंगेतून पाणी घेऊन घरी जाऊन अंघोळ करावी. अशा प्रकारचे वक्तव्य करणनं केलं आहे. त्याची ती टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. काहींना ती टिप्पणी जिव्हारी लागली आहे. नेटक-यांनी त्याच्यावर हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. काहींनी त्याला शिव्याही दिल्या आहेत. हिंदूच्या भावना दुखावून तुला काय मिळाले असा प्रश्न त्याला नेटक-यांनी विचारला आहे. अशा कारणास्तव त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सध्या उत्तराखंडमध्ये सुरु असणा-या महाकुंभमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. त्याठिकाणी 102 भाविक आणि 20 साधूंना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचे रुग्ण सापडूनही तेथील काही धार्मिक संघटनांनी कोरोनाची चाचणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. करणच्या पूर्वी रिचा चढ्ढानंही हरिव्दारमध्ये सुरु असणा-या कुंभमेळ्याविषयी टिप्पणी केली आहे. तिनं एका व्हिडिओच्या माध्यमातून असं भाष्य केलं की, हा इव्हेंट म्हणजे कोरोनाची महामारी पसवणारा आहे. सगळ्यात जास्त कोरोनाचा प्रसार करणारा इव्हेंट म्हणून कुंभमेळ्याविषयी सांगता येईल. असं रिचा म्हणाली होती.

लाखांहून अधिक साधू हे गंगेच्या ठिकाणी शाही स्नानासाठी एकत्र आले आहेत. अशावेळी त्यांनी कोरोनाची लागण होऊ नये यासाठी कुठलीही काळजी घेतलेली नाही. सगळ्यांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत असल्याचे रिचानं म्हटलं आहे.