अमिताभ यांच्या घरात 'गुड न्युज': झाले पुन्हा आजोबा

रंग दे बसंती या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये (Bollywood) स्वताची वेगळी ओळख प्रस्थापित करणारा अभिनेता म्हणून कुणाल कपूरची (Kunal Kapoor) ओळख आहे.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan

Kunal Kapoor: रंग दे बसंती या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये (Bollywood) स्वताची वेगळी ओळख प्रस्थापित करणारा अभिनेता म्हणून कुणाल कपूरची (Kunal Kapoor) ओळख आहे. त्यानं या चित्रपटाचून प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता कुणाल कपूरनं एक गुड न्यूज दिली आहे. सोशल मीडियावर त्यानं आपण बाप झाल्याचे सांगत तो आनंदोत्सव साजरा केला आहे. त्याची पत्नी नैनानं एका मुलाला जन्म दिला आहे. नैना ही बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची पुतणी आहे. एका अर्थी अमिताभ हे देखील आजोबा झाल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नानंतरच्या सात वर्षानंतर कुणालनं ही गुड न्युज दिली आहे. Bollywood Actor Kunal Kapoor good news amitabh bachchan grandfather

कुणालनं आपल्या इंस्टा अकाउंटवरुन पोस्ट शेयर करुन ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यानं स्वतंत्रपणे पोस्ट लिहून चाहत्यांच्या अभिनंदनाचा स्विकार करुन त्यांचे आभारही मानले आहेत. त्यानं लिहिलं आहे की, नैना मी आज खूप आनंदी आहे. तु गोड बातमी दिली आहे. मला तुझा अभिमान आहे. आपण एका मुलाचे आई वडिल झालो आहोत. अशा शब्दांत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कुणाल आणि नैना बच्चननं 2015 मध्ये सेशल्स याठिकाणी लग्न केलं होतं. काही निवडक मित्रांच्या उपस्थितीमध्ये त्यानं हे लग्न केलं. त्यावेळी सोशल मीडियामध्ये देखील त्यांच्या या लग्नाची चर्चा झाली होती. नैना बच्चन ही अमिताभ बच्चन यांचे छोटे बंधू अजिताभ बच्चन यांची मुलगी आहे. नैना ही व्यवसायानं बँकर असून तिला अभिनयाची आवड आहे. त्यामुळे तिनं काही वर्षांपूर्वी थिएटर जॉईन केलं होतं. त्यावेळी तिची अभिनेता कुणाल कपूरशी ओळख झाली होती.

Amitabh Bachchan
भारताचं राष्ट्रगीत टांझानियाच्या भावंडांनी गायलं; Video Viral

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com