या भारतीय 'वेब सीरिजचा' केन विल्यमसन जबरी चाहता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kane williamson
या भारतीय 'वेब सीरिजचा' केन विल्यमसन आहे जबरी चाहता

या भारतीय 'वेब सीरिजचा' केन विल्यमसन आहे जबरी चाहता

मुंबई - आपल्या आक्रमक फलंदाजीनं भल्या भल्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या केन विल्यमनसनची (kane williamson) क्रेझ कायम आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आवडीचा क्रिकेटपटू म्हणून त्याचे नाव घ्यावे लागेल. गेल्या न्युझीलंड सीरिजमध्ये त्यानं चमकदार कामगिरी केली होती. आता केन विल्यमसन चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचं भारतीय वेब सीरिजवर असलेलं प्रेम. विशेष गोष्ट अशी की, त्याच्या यादीमध्ये भारतीय वेबसीरिजची नावं आली आहेत. त्यामुळे केनच्या भारतीय चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. केनला चित्रपट पाहण्याची आवड आहे. कोरोनाच्या काळात त्यानं ओटीटीवर अनेक वेबसीरिजही पाहिल्या होत्या.

केननं आपल्या आवडत्या सीरीजविषयी सांगण्यामागे एक कारण घडलं. ते म्हणजे केन आणि बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता मनोज वाजपेयी यांची एक मिटींग आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये या दोन्ही सेलिब्रेटींनी आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्पाय मुव्हिजवर बातचीत केली. यावेळी केननं वेगवेगळे प्रश्न विचारुन मनोजला ( bollywood actor manoj bajpayee )हैराण केले होते. यानंतर मनोजनं एक वेगळा प्रश्न म्हणून केनला त्याच्या आवडीच्या सीरिजचं नाव विचारलं. त्याच्या उत्तरानं मनोजला मात्र धक्काच बसला. त्यानं त्याला ती मालिका पाहिली आहे का...असंही विचारलं. तेव्हा आपण कोविडच्या काळात त्याचा पहिला भाग पाहिला होती. दुसरा सीझनही पाहिल्याचे त्यानं सांगितलं.

हेही वाचा: 'विराट'काळात अजूनही सचिन तेंडुलकरचाच जलवा

हेही वाचा: रोहितची जागा घेणार राहुल; विराट नेतृत्वाला खास मित्राची साथ

केननं ज्या मालिकेचं नाव घेतलं. त्यामुळे मनोजनं काही वेळानं लगेचच ती मुलाखत सोडून दिली. केननं त्याच्या आवडीच्या मालिकेचं नाव म्हणून मिर्झापूरचं नाव घेतलं. त्यामुळे मनोजला काही वेळ आश्चर्य वाटलं. आपण या मालिकेचे दोन सीझन आपण पाहिले असून आपल्याला त्याच्या तिसऱ्या सीझनचे वेध लागल्याचे विल्यमसननं सांगितलं. केन म्हणाला, मालिकेचे आपण चाहते आहोत. त्याच्या दोन्ही सीझननं आपलं लक्ष वेधून घेतल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Bollywood Actor Manoj Vajpayee Reaction New Zealand Captain Kane Williamson Reveals Favorite Show

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..