Bedroom Secret: मिलिंद सोमणचे 'बेडरुम सिक्रेट'! 'माझी पत्नी ही..'|Bollywood Actor Milind Soman shares bedroom secrets | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Soman news

Bedroom Secret: मिलिंद सोमणचे 'बेडरुम सिक्रेट'! 'माझी पत्नी ही..'

Milind Soman On Sex Drive: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमण हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. भारताचा पहिला सुपरमॉडेल म्हणून त्याची वेगळी ओळख आहे. तो (Bollywood Actors) कायमच सोशल मीडियावर चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. आता तो चर्चेत आला आहे ते त्याच्या बेडरुम सिक्रेटमुळे. (Social Media news) एका मुलाखतीमध्ये मिलिंदनं आपल्याला नेहमीच पर्सनल लाईफ आणि रिलेशन यावरुन प्रश्न विचारले जातात. असं म्हटलं होतं. त्या प्रश्नांवर त्यानं मोकळेपणानं उत्तरं दिली आहेत. मिलिंद हा सध्या 56 वर्षांचा असून त्याची पत्नी अंकिता ही 30 वर्षांची आहे.

मिलिंदनं एका मुलाखतीतून आपल्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी (Ankita Kunwar) शेयर केल्या आहे. फार कमी लोकं मला माझ्या सेक्स लाईफविषयी विचारणा करतात. त्यांना मी माझ्या परीनं काही उत्तर देतो. ती म्हणजे लोकांना माझ्या वयाची चिंता आहे. पण ते माझ्या फिटनेसबाबत काही बोलायला मागत नाही. मी माझ्या फिटनेसवर मेहनत घेतो. वयाची साठी जवळ आली असताना आजही एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह माझ्याकडे आहे. त्याचे श्रेय फिटनेसला आहे. आम्ही दोघेही खूप नॉर्मल आहोत. माझी पत्नी अंकिता ही फिटनेस फ्रिक असल्यानं एकमेकांना आम्ही चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं आहे. असे मिलिंदनं यावेळी सांगितलं.

मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता हे दोघेही फिटनेस फ्रिक आहेत. त्यांच्या वयात तब्बल 26 वर्षांचे अंतर आहे. मिलिंदचे वय 56 वर्षे आहे. तर त्याची पत्नी ही 30 वर्षांची आहे. त्यांच्या लग्नाच्या बातमीनं अनेकांचे ल७ वेधून घेतले होते. सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. गेल्या वर्षी मिलिंद सोमण हा त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आला होता. गोव्याच्या समुद्रकिनारी धावतानाचा त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावरुन मोठा वादही झाला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा: Viral Post: हेमांगी कवी म्हणते, 'औकात में रेह!' पोस्टची तळटीप चर्चेत

मिलिंद सोमणच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची एक वेबसीरिजही आली होती. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पौरुषपूर असे त्या मालिकेचे नाव होते. त्यानंतर तो मलायका अरोरा आणि अनुषा दांडेकरच्या एमटीव्ही सुपर मॉडल ऑफ द इयरच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसला होता. त्यालाही त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा: Viral Memes: 'ज्यांच्या हिंदूत्वात ED, CBI त्यांच्याबरोबर जाणार आम्ही!'

Web Title: Bollywood Actor Milind Soman Shares Bedroom Secrets Interview Personal Life Physical Relation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..