प्रख्यात अभिनेता रवि किशन यांच्या भावाचे निधन, पोस्ट व्हायरल|Bollywood Actor Mp Ravi Kishan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Kishan

प्रख्यात अभिनेता रवि किशन यांच्या भावाचे निधन, पोस्ट व्हायरल

Bollywood News: भोजपूरी आणि बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असणाऱ्या रवि किशन (Ravi Kishan) यांच्या भावाचे आज निधन झाले आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर त्यासंबंधी एक पोस्ट शेयर करुन माहिती दिली आहे. रमेश शुक्ला असे त्यांच्या भावाचे नाव असून त्यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. रवि किशननं यासंबंधी सोशल मीडियावर रमेश यांचा एक फोटो देखील शेयर केला आहे.

रविनं फोटो शेयर करताना लिहिलं आहे की, माझ्या संपूर्ण परिवारासाठी दु;खद बातमी ती म्हणजे माझा भाऊ रमेश शुक्ला यांचे दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. त्यांना वाचविण्यासाठी मी खूप प्रयत्नही केले. मात्र आम्ही त्यांना काही वाचवू शकलो नाही. वडिलांनंतर आमच्या मागे सावलीसारखे उभे असणारे आमचे बंधु यांच्या जाण्यानं परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता त्यांची उणीव भरून येणं अवघड आहे. भगवान शंकर आपल्याला चिरंशांती देवो हीच त्याच्याकडे प्रार्थना. रमेशजी यांचे आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

हेही वाचा: Viral Video : नववधू जोमात, वऱ्हाडी कोमात!कारमध्ये बसून केलं हे कृत्य

रवि किशन यांनी पोस्ट शेयर करताच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यावर कमेंट केल्या आहेत. त्यात सेलिब्रेटींनी रमेश शुक्ला यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर कुमार विश्वास यांनी लिहिलं आहे की, आमचे बंधुप्रिय रमेशजी यांचे निधन हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. रवि किशन हे गोरखपूरचे खासदार आहेत. याशिवाय ते लोकप्रिय अभिनेताही आहेत. भोजपूरी चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांची लोकप्रियता मोठी आहे.

Web Title: Bollywood Actor Mp Ravi Kishan Brother Ramesh Shukla Passed Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..