actor nasseruddin shah
actor nasseruddin shah

'तर आम्ही वीस कोटी मुसलमान लढू'! नसिरुद्दीन शहांचं वक्तव्य

आपली भूमिका रोखठोकपणे मांडणे आणि त्यावर ठाम राहणे यामध्ये वर्गामध्ये बसणारे काही मोजकेच कलाकार आहेत.
Published on

मुंबई - आपली भूमिका रोखठोकपणे मांडणे आणि त्यावर ठाम राहणे यामध्ये वर्गामध्ये बसणारे काही मोजकेच कलाकार आहेत. त्यामध्ये प्रख्यात अभिनेते नसिरुद्दीन शहा (bollywood actor nasseruddin shah) यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. प्रतिभावान अभिनेते म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. त्यांनी आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून नसिरुद्दीन शहा हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे देखील चर्चेत आले आहे. त्यांचे आताचे एक विधान त्यांची डोकेदुखी वाढवणारे ठरताना दिसत आहे.

एका न्युज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन यांनी धार्मिक विधानं केली आहेत. त्याचं झालं असं की, काही जहाल मतवादी विचारांच्या धार्मिक संघटनांनी मुस्लिम व्यक्तींची हत्या करण्याची धमकी दिली. त्यावरुन भडकलेल्या नसिरुद्दीन शहा यांनी आपली भूमिका मांडली आहे. शहा म्हणाले, मला तर आता लोकांवर विश्वासच राहिलेला नाही. त्याचे कारण म्हणजे लोकं काय विचार करतील हे सांगता येत नाही. अनेकांना या देशामध्ये धर्माच्या नावावर युद्ध सुरु करायचं आहे. त्यांना याठिकाणी शांतता नको आहे. काही करुन वातावरण दुषित कसे होईल याचाच विचार सतत केला जातो. हे सांगावं लागेल.

actor nasseruddin shah
Bollywood patriotic dialogues 'दुध मांगोगे तो खिर देंगे कश्मिर मागोंगे तो ...'

या देशामध्ये आता वीस कोटी मुस्लिम आहेत. आम्ही सगळे भारतीय आहोत. भारताचे आहोत. जर कोणी आम्हाला विनाकारण त्रास देत असल्यास आपण काय बोलावं, अनेकांना उगाचच त्रास द्यायला आवडते. त्यांना काही करुन वाद निर्माण करणं हेच ध्येय असतं. अशावेळी फार जपून वागण्याची गरज असते. माथेफिरु आपल्याला भडकवात. अशावेळी संयमही महत्वाचा आहे. आम्हीही या देशाचे आहोत हे ऐकुनही आम्हाला विनाकारण त्रास देत असल्यास आम्हीही त्यांचा लढून सामना करु. असे शहा यांनी यावेळी सांगितले.

actor nasseruddin shah
Movie Review; एकदा थोडी घेतली तर बिघडलं कुठं?, सात बायकांचा 'झिम्मा'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com