
नवाझुद्दीन म्हणतो, बॉलीवूडला 'तीन' गोष्टी बदलाव्याच लागतील
Bollywood News: बॉलीवूड़मध्ये आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये नवाझुद्दीन सिद्धिकीचं नाव घ्यावं लागेल. प्रख्यात (Bollywood Movies) अभिनेता आमीर खानच्या सरफरोशमध्ये एक छोटयाशा भूमिकेत दिसलेल्या नवाझुद्दीनचा (Nawazuddin sidiqui) संघर्ष फार मोठा आहे. त्याला अनुराग कश्यपनं त्याच्या गँग्स ऑफ वासेपूरमधून ब्रेक दिला. तिथून नवाझुद्दीन हा लाईमलाईटमध्ये (social media news) आला. हल्ली तो त्याच्या वेगवेगळ्या मुलाखतीतून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. आता त्यानं एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यामध्ये तो (Hindi Entertainment News) म्हणतो काहीही झालं तरी आपल्याला बॉलीवूडमधील तीन गोष्टी बदलायच्या आहे. त्या कोणत्या हे आपण जाणून घेणार आहोत. (Bollywood Latest Marathi News)
काही दिवसांपासून नवाझुद्दीननं बॉलीवूडमध्ये जे काही चालतं त्याविषयी सणकून वक्तव्यं करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याला बॉलीवूडमध्ये ज्याप्रकारे काम करवून घेतलं जातं ते मान्य नसल्याचे नवाझुद्दीननं सांगितलं आहे. मोठ्या प्रमाणात चांगले कलाकार बॉलीवूड सो़डून दुसऱ्या चित्रपटक्षेत्रामध्ये काम करताना दिसत आहे. ही लोकं बॉलीवूड का सोडत आहे असा प्रश्न मला जेव्हा पडतो तेव्हा माझी काही उत्तरं आहेत. त्यावरुन मला असे दिसून आले की, आपण जोपर्यत बॉलीवूडमधील तीन गोष्टी बदलत नाही तोपर्यत आपल्याला समाधान वाटणार नाही. एका मुलाखतीमध्ये नवाझुद्दीननं आपल्याला रंगावरुन हिणवल्याचे सांगितले होते.
हेही वाचा: PHOTO VIRAL: आता काय बोलायचं, ह्रतिकनं सांभाळली प्रिती झिंटाची मुलं!
एका मुलाखतीमध्ये नवाझुद्दीनला काही प्रश्न विचारण्यात गेले. त्यात तुला बॉलीवूडमध्ये काय बदलायला आवडेल असे विचारले तेव्हा त्यानं तीन गोष्टी सांगितल्या. गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूडमधून पुष्पा, वल्लीमाई, केजीएफ 2, द बिस्ट नावाचे चित्रपट प्रचंड यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्यावरुन नवाझुद्दीननं सांगितलं. आपल्याला सर्वात प्रथम बॉलीवूडचे नाव बदलून ते हिंदी फिल्म इंडस्ट्री असे ठेवावे लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे जे लोकं रोमनमध्ये वाचण्यासाठी स्क्रिप्ट मागवून घेतात त्यापेक्षा ती देवनागरी मध्ये मागवावी म्हणजे बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जी भाषा येते त्यात बोला. मला सेटवर इंग्रजी येत नाही. म्हणून मला त्याचे काहीही वाटत नाही.आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला आनंद वाटायला हवा. असे नवाझुद्दीनं म्हटलं आहे.
हेही वाचा: KGF 2: वा रे पठ्ठया! लग्नाच्या पत्रिकेत छापले केजीएफ चे डायलॉग
Web Title: Bollywood Actor Nawazuddin Sidhiqui Share Three Things Should Be Change Interview
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..