KGF 2: वा रे पठ्ठया! लग्नाच्या पत्रिकेत छापले केजीएफ चे डायलॉग

टॉलीवूडच्या चित्रपटांनी गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे.
KGF 2 Movie News Updates,
KGF 2 Movie News Updates, esakal

Tollywood Movie: टॉलीवूडच्या चित्रपटांनी गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्या चित्रपटांमुळे बॉलीवूडचा नाकी नऊ आले (Pushpa Movie) आहेत. सध्याच्या घड़ीला एकही बॉलीवूडचा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाला नाही. अल्लु अर्जुनच्या पुष्पापासून टॉलीवूडची जी (Bollywood News) जोरदार सुरुवात झाली आहे ती अद्याप कायम आहे. त्याचा प्रभाव बॉक्स ऑफिसवर दिसून आला आहे. केजीएफच्या दुसऱ्या चॅप्टरची प्रेक्षक (KGF 2 chapter) गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होते. त्यामुळे तो प्रदर्शित झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं थिएटरमध्ये गर्दी (Entertainment news) करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर देखील त्यासंबंधी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, रिल्स व्हायरल होत आहे, अशाच एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (KGF 2 Movie News Updates)

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीनं चक्क त्याच्या लग्न पत्रिकेवरच केजीएफचे दोन मधील डायलॉग छापले आहेत. त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ती पत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली आहे. सोशल मीडियावर कमी वेळेत जास्त लोकप्रिय होण्यासाठी नेटकरी काय करतील याचा भरवसा नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका गावातील शेंगा विकणारा भुवन सोशल मीडिया स्टार झाला होता. त्याचा कच्चा बादाम नावाचं गाणं तुफान व्हायरल झालं होतं. तो रातोरात लाईमलाईटमध्ये आला होता. त्याला भेटण्यासाठी, त्याच्या समवेत फोटो काढण्यासाठी अनेकांनी त्याच्या घराबाहेर गर्दीही केली होती.

केजीएफच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलायचे झाल्यास त्यात यश, संजय दत्त आणि रविना टंडन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्याच्यातील संवाद, गाणी आणि यशच्या लूकचे रिल्स व्हायरल होताना दिसत आहे. अशातच एका व्यक्तीनं त्याच्या लग्नाच्या पत्रिकेवर केजीएफ दोनचे संवाद छापून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. चित्रपटात यश म्हणतो, व्हायलन्स, व्हायलन्स व्हायलन्स, मला तो आवडत नाही मी नेहमीच त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र व्हायलन्सलाच मी आवडत असल्यानं मला त्याच्यापासून दूर जाता येत नाही. अशा अर्थाच्या संवादाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. आता तोच डायलॉग त्या नेटकऱ्यांना आपल्या लग्न पत्रिकेवर छापला आहे. ती व्यक्ती कर्नाटकात राहणारी असून त्याचे नाव चंद्रशेखर असे आहे.

KGF 2 Movie News Updates,
Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com