esakal | Video: कारची जोरदार धडक, मुलं रितेशला म्हणे, 'बाबा आई आली'
sakal

बोलून बातमी शोधा

riteish deshmukh video

Video: कारची जोरदार धडक, मुलं रितेशला म्हणे, 'बाबा आई आली'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील (bollywood) लोकप्रिय जोडी म्हणून रितेश (riteish deshmukh) आणि जेनेलियाकडे (genelia desouza) पाहिले जाते. हे दोघेही सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टिव्ह असतात. सध्या रितेशचा एक गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. यापूर्वी देखील त्या दोघांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेयर केले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन झाले आहे. कोरोनाच्या काळात देखील रितेश आणि जेनेलियानं काही चाहत्यांना काळजी घेणारे आवाहनापर व्हिडिओ शेयर केले होते. त्यालाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (bollywood actor riteish deshmukh funny video shows genelia dsouza deshmukh hits car yst88)

आता रितेशनं जो व्हिडिओ शेयर (video share on social media) केला आहे, त्याला त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. त्याला काही गंमतीशीर कमेंटही आल्या आहे. त्या व्हिडिओची सुरुवात एका कारच्या मोठ्या डॅशनं होते. त्यानंतर खिड़कीत उभी असलेली रितेश आणि जेनेलियाची दोन मुलं रितेशला म्हणतात, बाबा, आई आली. अर्थात त्या व्हिडिओमध्ये जी कारची धडक दाखविण्यात आली आहे ती एका दुसऱ्या व्हायरल व्हिडिओमधील आहे.

व्हिडिओ इतक्यात संपत नाही. त्यानंतर रितेशची मुलं त्याला म्हणतात, ती तुमची गाडी घेऊन गेली होती. हे ऐकल्यावर रितेशच्या त्या पोस्टवर असे लिहून येते की, ती माझी गाडी घेऊन गेली होती. यानंतर बॅकग्राऊंडला ओम शांती ओममधील जग सुना सुना लागे रे हे गाणे वाजते. या गंमतीशीर व्हिडिओला चाहत्यांनी पसंत केले आहे. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत.

हेही वाचा: तूफान!! इतक्या गर्मीतही गुल पनाग ५ किलोमीटर धावली

हेही वाचा: 'सारखं कौतुक केलं तर, मुलं बिघडतील' सोनूचं रिअ‍ॅलिटी शोवर मत

यापूर्वी देखील रितेश आणि जेनेलियानं वेगवेगळ्या प्रकारचे गंमतीशीर व्हिडिओ शेयर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे ते नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्यातील तो कॉमिक अंदाज प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतो.

loading image