'रोजा नाही, असा कसा तू मुस्लिम!' कुटूंबासमवेत बाहेर जाणं सैफला पडलं महागात|Bollywood Actor Saif Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

saif Ali khan Kareena Kapoor

'रोजा नाही, असा कसा तू मुस्लिम!' कुटूंबासमवेत बाहेर जाणं सैफला पडलं महागात

Bollywood News: बॉलीवूडचा अभिनेता सैफ अली खान (saif ali khan) आणि त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हे नेहमीच सोशल मीडीयावर चर्चेचा विषय असतात. त्यांना त्यांच्या पहिल्या मुलावरुन तैमुरवरुनही (Taimur) अनेकदा ट्रोल केले गेले आहे. हे दोन्ही कलाकार त्यांच्या अभिनयापेक्षा (Social media viral news) इतर गोष्टींसाठी अधिक चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा सैफचं कुटूंब वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तो आपल्या (Bollywood celebrity) फॅमिली समवेत जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेला असताना त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर सध्या त्याची चर्चा सुरु झाली आहे. सैफ हा त्याची मुलगी सारा, मुलगा इब्राहिम यांच्यासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता.

काही कट्टरपंथीयांनी सैफला ट्रोल केले आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या रमजानचे रोजे सुरु आहेत. आणि सैफनं त्यानिमित्तानं रोजाचे उपवास न केल्यानं त्याला ट्रोल करण्यात आले आहे. यावेळी सैफ त्याच्या हटके लुकमध्ये दिसला. समवेत करिनाही कॅज्युअल लुकमध्ये होती. सोशल मीडियावर या कुटूंबाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. त्याला नेटकऱ्यांनी रोजा पाळण्याचा सल्ला दिला आहे. तर अनेकांनी तू असा कसा मुस्लिम आहेस, तुला रमजानचे महत्व कळत नाही का, असा थेट सवालही विचारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सैफ हा त्याच्या कुटूंबासमवेत वेगवेगळ्या ठिकाणी मेजवानीसाठी जात असल्याचे दिसून आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Viral Video: तरुणीचा उंच टेकडीवरचा थरारक Cycle Stunt पाहिला का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं मात्र सैफला चांगलेच धारेवर धरले आहे. तू तर रोजा पाळत नाही किमान मुलांना तरी धर्माबद्दल सांग असे नेटकऱ्यांनी सैफला सुनावले आहे. काही दिवसांपूर्वी सारानं इब्राहिमसोबत एक फनी व्हिडिओ शेयर केला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. सैफ आणि करिना यांच्या वेगवेगळ्या पोस्टला चाहते नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. बॉलीवूडमधील सर्वात चर्चेतील कुटूंब म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. सैफच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो साऊथच्या विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Bollywood Actor Saif Ali Khan Kareena Kapoor Sara Ali Khan Rolled Ramadan Days Outside Lunch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top