सलमानच्या घरच्यांना घर खाली करावं लागलं, बिग बींच्या सुरक्षेत वाढ | Bollywood Actor Salman Khan life Threat amitabh bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan-Shahrukh Khan
सलमानच्या घरच्यांना घर खाली करावं लागलं, बिग बींच्या सुरक्षेत वाढ

सलमानच्या घरच्यांना घर खाली करावं लागलं, बिग बींच्या सुरक्षेत वाढ

बॉलीवूड स्टारचं (Bollywood Star Amitabh Bachchan) लाईफ (bollywood celebrity) भलेही आपल्याला कितीही ग्लॅमरस वाटत असेल मात्र त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांना सामोरं जावं लागतं. याविषयी काही माहिती नसतं. लाखोंनी फॅनफॉलोअर्स (Fan followers) असणाऱ्या सेलिब्रेटींना त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाविषयी फार कमी गोष्टी समोर आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला मध्यप्रदेशातील एकानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानं पोलिसांना फोन करुन आपण त्याचा मन्नत (Mannat Bunglow) नावाचा बंगला बॉम्बनं उडवून देणार असल्याचे सांगितलं होतं. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अशीच घटना बॉलीवूडचा भाईजान सलमानसोबतही घडली होती.

मुंबई पोलिसांना (Mumbai Police) तर बॉलीवूडच्या सेलिब्रेटींच्या (Bollywood actors) सुरक्षेकडे जास्तच लक्ष द्यावे लागते. त्यांच्या जीवाला कुठला धोका तर नाही ना याकडे त्यांची नजर असते. सेलिब्रेटींना येणारे निनावी फोन, धमक्या, खंडणीचे फोन याकडे त्यांचे लक्ष असते. यापूर्वी सलमान खान आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील अशाच प्रकारच्या धमक्यांना सामोरं जावं लागलं होतं. 2019 मध्ये सलमाच्या कुटूंबियांसमवेत देखील अशीच घटना घडली होती. सलमानला एक मेल आला होता. त्यामध्ये असं सांगितलं होतं की, तो ज्याठिकाणी राहतो त्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा तेव्हा व्हायरल झाली होती.

हेही वाचा: Movie Review; पोरकट, बालिश अन् उथळ हेच 'अंतिम - सत्य'

या घटनेनंतर सलमानच्या कुटूंबियांनी तातडीनं तो फ्लॅट रिकामा केला होता. त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आले होते. दोन तासांत सलमानच्या अपार्टमेंटमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले होते. तो थांबवता येत असेल तर थांबवा असं आवाहनही करण्यात आलं होतं. त्यावेळी गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिग बी अमिताभ यांना देखील अशाच प्रकारच्या धमक्यांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

हेही वाचा: Movie Review : 'डार्लिंग' प्रेमाचा त्रिकोण

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top