
'माझ्या डोळ्यात बघुन ते तीन शब्द बोल': मल्लिकाच्या अटीवर सलमान लाजला
Bollywood News: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या हटके (Salman Khan) स्टाईलसाठी प्रसिद्ध असणारा अभिनेता आहे. त्याचा फॉलोअर्सही मोठा आहे. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारा सलमान हा त्याच्या जीवलग मैत्रीणीमुळे पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये आला आहे. त्याच्या त्या मैत्रीणीचे नाव (Entertainment News) म्हणजे मल्लिका शेरावत. बिग बॉसच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या मल्लिकानं सलमानला एक प्रश्न विचारला होता. वास्तविक मल्लिका असा कोणताही प्रश्न विचारणार याची कल्पना नसलेल्या सलमानने जेव्हा तिचा (Bollywood actress) प्रश्न ऐकला तेव्हा त्याला धक्काच बसला. तो काही काळ स्तब्धही होता. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना देखील त्या प्रश्नामुळे नवल वाटले होते.
बॉलीवूडमध्ये सलमान खानच्या वेगवेगळ्या लवस्टोरी प्रसिद्ध आहेत. 90 च्या दशकांपासून ते आता नव्या गर्लफ्रेंडपर्यत त्याच्या स्टोरीजनं प्रेक्षकांचे मनोरंजन (Mallika Sherawat) तर झाले आहेत. मात्र त्यावरुन तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. दबंग पासून सलमानचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटानं पुन्हा त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यानंतर त्याची गाडी सुसाट सुटली. या दरम्यानच्या काळात सलमानचा बिग बॉस नावाचा सीझन सुरु झाला. त्या शो ने प्रसिद्धीच्या झोतात आला होता. सलमानच्या त्या शो मध्ये बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी भेटी दिल्या आहेत. त्यात बरेचजण आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतात. सध्या मल्लिकानं सलमानवर जी मल्लिनाथी केली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये मल्लिकानं विचारलेला प्रश्न सलमानच्या चाहत्यांसाठी धक्कादायक असाच होता.
हेही वाचा: Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!
सलमानचा एक जुना व्हिडिओ हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये मल्लिका ही बिग बॉसच्या सेटवर जाते आणि आपल्या मनातील गोष्ट सगळ्यांना बोलून दाखवते. त्यानंतर ती सलमानला देखील ते तीन शब्द बोलण्याची विनंती करते. त्यावेळी सलमान कमालीचा लाजल्याचे दिसून आले आहे. माझ्या डोळ्यात पाहून तू ते तीन शब्द बोल. त्यावर सलमानला काय बोलावे, हेच कळेना....सध्या तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Web Title: Bollywood Actor Salman Khan Malika Sherawat Proposed Said I Love You Three Words
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..