अनन्या असली म्हणून काय झालं?: मुंबई पोलिसांनी दाखवला इंगा

अभिनेत्री अनन्या पांडेशी संबंधित बातमी सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे.
Ananya Panday
Ananya Panday
Updated on

Ananya Panday Car Locked: अभिनेत्री अनन्या पांडेशी संबंधित बातमी सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे. ती म्हणजे (bollywood actress) पोलिसांनी तिची गाडीच लॉक केली होती. चित्रिकरणामध्ये आपण कुठे गाडी लावली याचा अनन्याला विसर पडला (social media) त्यामुळे ती गाडी लॉक करण्यात आली होती. त्याचे काही (Bollywood News) फोटोही सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा गहराईया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यावरुन वेगळाच वाद सुरु आहे. अनन्याचे (Ananya Pandey) त्या चित्रपटामध्ये असणारे फोटो नेटकऱ्यांच्या थट्टेचा विषय आहेत. त्यांनी तिच्यावर असभ्य भाषेत टीकाही केली आहे.

मुंबईतील एका स्टूडिओमध्ये अनन्याच्या एका चित्रपटाचे शुटींग सुरु (Deepika Padukone Gheriyaan Movie) होते. तिच्यासह आणखी काही क्रु मेंबर्सच्या गाड्यांनाही पोलिसांनी जॅमर लावले होते. मात्र ही जागा स्टूडिओच्या वस्तु ठेवण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या पांडेच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांशी चर्चा करुन प्रकरण मिटवले आहे. दुसरीकडे अनन्यानं गहराईयावर ज्यांनी तोंडभरुन कौतूक केलं आहे अशा चाहत्यांचे अनन्यानं आभार मानले आहेत. टियाचे वेगवेगळे मूडस, तिचं व्यक्तिमत्व यानिमित्तानं मला साकारता आलं याचा विशेष आनंद आहे. अनन्या ही आता लवकरच लायगर नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यामध्ये देखील सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवची महत्वाची भूमिका असणार आहे.

Ananya Panday
Movie Review: टेस्टिंगच्या नावाखाली माणसांच्या जीवाचा बाजार मांडणारा 'Human'

अनन्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती विजय देवरकोंडाच्या लायगर नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचा टीझर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी असणाऱ्या अनन्यानं स्टूडंट ऑफ द इयर 2 मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

Ananya Panday
Movie Review: समुद्राची गाज, दीपिकाचा रोमान्स 'गहराईयात' दुसरं नाही काही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com